Breaking News

जिजाऊ माँ साहेब म्हणजे नेतृत्व, कर्तृत्व, मातृत्वाची मुर्ती’


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

मुंबई, दि. 17 : राजमाता जिजाऊ माँ साहेब यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकारण्याची कर्तबगारी दाखविली. त्या नेतृत्व, कर्तृत्व आणि मातृत्वाच्या मुर्ती होत्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना स्मृतिदिनी अभिवादन केले आहे.

          अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य आणि लोककल्याणकारी राज्य स्थापनेची प्रेरणा राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्याकडून मिळाली. त्या मातृत्वाची मुर्ती होत्या पण तितक्याच करारी कर्तृत्वान होत्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांना शौर्य, धैर्य आणि नेतृत्व गुणांचे धडे दिले. यामुळेच परकियांच्या जुलमी राजवटी उलथून गेल्या. रयतेतील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची शिकवण त्यांनी दिली. स्वराज्यात धर्मा इतकाच त्यांचा स्री रक्षण-सक्षमीकरणाबाबत कटाक्ष होता. त्यांच्या नजरेतील स्वराज्य व सुराज्य आणण्यासाठी प्रयत्नशील राहू या, हेच विश्ववंद्य जिजाऊ माँ साहेब यांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि त्यांना मानाचा मुजरा.

About Shivshakti Times

Check Also

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक……..

दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण …

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची विधानभवनात गृहमंत्र्यांसोबत बैठक संपन्न

पोलिस पाटीलांचे मानधन वाढीसह अनेक प्रश्न मार्गी लागणार शिवशक्ती टाइम्स न्यूज महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील …

बाजारपेठांना ‘लग्नसराई’चा साज…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण ) बदलापूर : तुळशी विवाहनंतर आता लग्नसराईला सुरुवात झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *