Breaking News

शारीरिक साक्षरतेसाठी हालचाल आणि क्रीडा कौशल्ये शिकणे गरजेचे

    – मंत्री सुनील केदार

मुंबई, दि.17 : पुर्ण शारीरिक साक्षरतेसाठी, मुलांनी चार मूलभूत क्रीडा वातावरणात हालचाल आणि क्रीडा कौशल्ये शिकली पाहिजेत. तरच मुलांना मोठ्या प्रमाणात शारीरिक क्रियाकलाप आणि खेळाच्या परिस्थितीमध्ये आत्मविश्वासाने आणि सक्षमतेने पुढे जाण्यास मदत होते असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी केले.

          श्री शिवाजी शारीरिक महाविद्यालया अमरावती, ई.एल.एम.एस.स्पोर्टस आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिडीओ काँन्फरन्सव्दारे प्रत्येक मुलाचे जीवन क्रियाशील होण्याकरिता तयार केलेला दृष्टिकोन या विषयावर आयोजित चार दिवसाच्या व्याख्यानमालेत श्री.केदार बोलत होते.

          श्री केदार म्हणाले, सर्व मुलांमध्ये शारीरिक साक्षरता विकसित करण्यासाठी पालक,  शिक्षक आणि क्रीडा प्रशिक्षक यांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असते. तसेच मुलांच्या विकासात गुंतलेल्यांना शारीरिक साक्षरतेचा अर्थ काय आहे आणि ते कसे विकसित केले जाऊ शकते हे समजून घेणे देखील गरजेचे आहे.

     प्रौढांप्रमाणे कौशल्य बजावण्याऐवजी ते शिकत असलेल्या कौशल्याच्या पुढील आवृत्तीकडे जाण्याचे पालकांचे लक्ष्य असले पाहिजे. मुलांसमवेत काम करणा-यांना कौशल्ये शिकण्याच्या अवस्थांशी परिचित असणे देखील आवश्यक असल्याचे श्री केदार यांनी सांगितले.

About Shivshakti Times

Check Also

पोलीस हवालदार इकबाल अ. रशिद शेख महाराष्ट्र राज्यात व्दितीय.

Best Practices in C.C.T.N.S. and I.C.J.S. प्रणालीतील वैयक्तिक उत्कृष्ट कामगीरी मध्ये पोह/1465 इकबाल अ. रशिद …

जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिका गुड्ड तिवारीचा खून,

कमाल चौकात दिवसाढवळ्या थरार…… नागपूर : जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. …

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक……..

दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *