Breaking News

डेटिंग साइटवर लग्नाचं आमिष; तरुणीला ९३ हजारांचा गंडा -शिवशक्ती टाइम्स न्यूज

डेटिंग साइटवर लग्नाचं आमिष; तरुणीला ९३ हजारांचा गंडा

पुणे १९ जून :⭕ डेटिंग साइटवर ओळख झालेल्या तरुणाने उंड्री परिसरातील एका तरुणीची लग्नाच्या आमिषाने ९३ हजारांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना डिसेंबर २०१९ ते मे २०२० कालावधीत उंड्रीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी एका खासगी कंपनीत कामाला आहे. तरुणीने डेटिंग साइटवर नावनोंदणी केली होती. त्या ठिकाणी आरोपीसोबत तरुणीची ओळख झाली. त्या तरुणाने तरुणीला संपर्क करून ओळख वाढविली. त्यानंतर विविध कारणे सांगून तिच्याकडून ऑनलाइन माध्यमातून ९३ हजार रुपये घेतले. पैसे घेऊनही लग्न न करता फसवणूक केल्याप्रकरणी तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस अधिक तपास करत आहेत.

About Shivshakti Times

Check Also

मटण बनवण्यास उशीर होईल सांगितल्याने पती संतापला, मारहाणीत पत्नीचे दातच पाडले……..

मटण बनवण्यास उशीर होईल सांगितल्याने पती संतापला, ⭕मारहाणीत पत्नीचे दातच पाडले…….. शिवशक्ती टाइम्स न्यूज – …

सांगली खून प्रकरण गुन्हे शाखा युनिट चार पिंपरी-चिंचवड कडून मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत अटक व गुन्हा उघड

पिंपरी-चिंचवड-  प्रतिनिधी – युसूफ पठाण  याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 13 सप्टेंबर 2020 रोजी …

 पुणेकरांना दिलासा…! पुणे जिल्ह्यातील मार्गावर सुरू होणार….! एसटीची सेवा – शिवशक्ती टाइम्स न्यूज

🛑 पुणेकरांना दिलासा…! पुणे जिल्ह्यातील मार्गावर सुरू होणार….! एसटीची सेवा 🛑 ✍️ पुणे 🙁  ब्युरो चीफ शिवशक्ती टाइम्स न्यूज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *