कृषी मंत्री
बाप माझा कष्टकरी
उन्हा तान्हात राबतो
मदतीला त्याच्यासाठी
शिवारफेरी काढतो
पिक विमा खात्यावर
थेट आता पोहचतो
कांदा असो वा कापूस
खळ्यावरच मोजतो
बांधावरच नाही तर
माय मातीला भेटतो
बाच्या शेतात जाऊन
थोडा राहक्या हाकतो
बळीराजा सुखी नांदो
पांडुरंगाला मागतो
‘मंत्री’ असलो तरीही
लेक मातीचा शोभतो
– राजेंद्र केवळबाई प्रल्हाद दिघे
-९४२१६००७११