Breaking News

यंदाचा गणेशोत्सव नेहमीसारखा नसेल; मुख्यमंत्र्यांचा मंडळांशी संवाद मुंबई ( ब्युरो चीफ )

यंदाचा गणेशोत्सव नेहमीसारखा नसेल; मुख्यमंत्र्यांचा मंडळांशी संवाद

मुंबई, 19 जून : ⭕ करोनाचं संकट आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची आज मंत्रालयात बैठक झाली. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. (Uddhav Thackeray on Ganpati Festival)

‘करोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात आज मंत्रालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील व शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर, राज्यभरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘पुणे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे. सरकारच्या निर्णयास पूर्णपणे पाठिंबा असल्याची ग्वाही गणेश मंडळांनी दिली आहे. शिर्डी, सिद्धिविनायक व अन्य संस्थांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मोठी मदत केली आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.

‘नेहमीप्रमाणे यंदा हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. करोनाचा धोका संपलेला नाही. गर्दी करता येणार नाही, मिरवणुका काढता येणार नाहीत. करोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल. ही साधेपणाची चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात पुनःश्च हरिओम करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. गणेशोत्सवही याच चौकटीत राहून साजरा करावा लागेल. परंपरा खंडित होणार नाही याची काळजी घेतानाच सामाजिक भान ठेवावे लागेल. संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव आपण साजरा करू,’ असं मुख्यमंत्री म्हणाले. गणेश मंडळांनी सामाजिक जनजागृतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.⭕

About Shivshakti Times

Check Also

स्वत:चा सख्खा भाऊ १२ वर्षे राज्याचा गृहमंत्री असतानाही…;

आर. आर. पाटलांच्या भावाचं अजित पवारांकडून कौतुक…. सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित …

बेळगाव : एका ट्रॅक्टरला तब्बल 12 ट्रॉली लावल्या.6 जणांविरोधात गुन्हा

शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – राजेश सोनवणे बेळगाव ता. अथणी : सध्या ऊस हंगाम सर्वत्र …

राज्यमंत्री बच्चू कडूंच्या नावे चिठ्ठी लिहुन शेतकऱ्याची आत्महत्या, पोलीस अन् व्यापाऱ्यांनी मारहाण केल्याचे नमुद

शिवशक्ती टाइम्स न्यूज  प्रतिनिधी युसूफ पठाण अमरावती : संत्र्याच्या व्यवहारात व्यापाऱ्याने केलेली फसवणूक व त्यापाठोपाठ …

Leave a Reply

Your email address will not be published.