Breaking News
Soujanya-ABP MAZA NEWS

Covid 19 कोरोनावरील प्रभावी औषध ‘कोरोनिल’ लॉन्च – कोरोनावर प्रभावी असे आयुर्वेदिक औषध शोधल्याचा पतंजलीकडून दावा

Covid 19 कोरोनावरील प्रभावी औषध ‘कोरोनिल’ लॉन्च (बाबा रामदेव यांची पत्रकार परिषद )- शिवशक्ती टाईम्स न्यूज

नवी दिल्ली (शिवशक्ती टाईम्स न्यूज ): संपूर्ण जगभरात आज कोरोना व्हायरस – Covid 19 ने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमी वर सर्व जगात कोरोनावरील लसी साठी संशोधन चालू असताना पतंजली कडून योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोनावर प्रभावी असे आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा करून ‘कोरोनिल’ नावाचे औषध आज रोजी लॉन्च केले.
एका पत्रकार परिषदेत योगगुरु रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी याबाबत घोषणा केली.’कोरोनिल’ औषधाच्या ट्रायलमध्ये सहभागी शास्त्रज्ञ, रिसर्चर, डॉक्टर, उपस्थित होते.
यावेळी स्वामी रामदेव बाबा म्हणाले की, संपूर्ण सायंटिफिक डॉक्यूमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनावरील एविडेंस बेस असलेलं आयुर्वेदिक औषध आहे. पतंजलीच्या मते, हा रिसर्च संयुक्तपणे पतंजली रिसर्च इंस्टीट्यूट (पीआरआय) हरिद्वार, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस (NIMS), जयपूरने केला आहे. ‘कोरोनिल’ औषधाची निर्मिती दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वारकडून केली जात आहे.

आचार्य बालकृष्ण औषधाच्या लॉन्च कार्यक्रमावेळी म्हणाले की, आज पतंजली परिवारासाठी समाधानकारक दिवस आहे. मानवतेच्या सेवेसाठी संपूर्ण पतंजली परिवार पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. ही आनंदाची बातमी सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. योगगुरु रामदेव बाबा, आचार्य बालकृष्ण, पतंजलीच्या सर्व शास्त्रज्ञांचे, NIMS यूनिवर्सिटीचे डॉ. बलवीर सिंह आणि सर्वांचं शिवशक्ती टाईम्स न्यूज कडून अभिनंदन. आयुर्वेद हा भारतीय पूर्वजांनी दिलेला एक खजिना आहे. हे ‘कोरोनिल’ औषध लवकरात लवकर रुग्णांना बरे करण्यास मदत करेल अशी आशा संपूर्ण देश लावून आहे.

 

 

About Shivshakti Times

Check Also

मालेगावी १० तलवारींसह चौघे ताब्यात

शहर पोलिस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी शहरातील रमजानपुरा …

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *