‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्राय‘ उपक्रमांत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -माजी खासदार समीर भुजबळ (शिवशक्ती टाईम्स न्यूज )
नाशिक दि. २३ (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मते व सूचना जाणून घेण्यासाठी तसेच तळागाळातील प्रश्न समजून घेण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्राय‘ उपक्रमांत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले आहे.
आज नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी व सर्व सेलच्या तालुकाध्यक्षांची एकत्रित बैठक व्हिडीओ कान्फरन्सिंगद्वारे संपन्न झाली. त्यावेळी भुजबळ बोलत होते. राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय नोंदणीमध्ये सर्वांनी झोकुन देऊन काम करावे व नाशिक जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर झळकवावे असे आवाहनही माजी खासदार समीर भुजबळ यांनी यावेळी बोलतांना केले.
जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय मोहीम, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकर्त्यांकडून राबविण्यात येत असलेले विविध कार्यक्रम, रक्तदान शिबिरे यांचा आढावा घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्राय मोहिमेत सहभागी होण्यासाठी दि.2५जून पर्यंत या http://bit.ly/
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनापासून राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानास सुरूवात झाली आहे. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभाग नोंदवला असुन राज्यात आतापर्यंत विविध माध्यमातून ५ लाखाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचता आले असल्याने या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उभारणीस योगदान दिले आहे अशा प्रत्येकाचे म्हणणे जाणून घेतले जात आहे. तसेच मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हा स्तरावरील पक्षाचे सर्व कार्यकर्ते, गाव व बूथ कमिटीचे कार्यकर्ते व अन्य पदाधिकाऱ्यांकडुन सूचना मागविण्यात येणार आहेत. गावपातळीवरील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी इतक्या मोठ्या पातळीवर मोहीम हाती घेणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे. त्यानुसार पक्षाच्या सदस्यांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्राय‘ या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी सर्वश्री डॉ.सयाजी गायकवाड, पुरूषोत्तम कडलग, प्रेरणा बलकवडे, संदिप पवार, राजेंद्र सोनवणे, यशवंत शिरसाठ, शैलेश सुर्यवंशी, राजेंद्र भामरे, विजय पाटील, वसंत पवार, साहेबराव मढवई, योगेश पाटील, दिपक लोणारी, भास्कर भगरे, राजेंद्र डोखळे, डॉ. योगेश गोसावी, विजय पवार, जितेंद्र पगार, दीपक लोणारी, जितेंद्र आहेर, सुनील आहेर, सम्राट काकडे, मुश्रीफ शहा, अपर्णा देशमुख, नाना शिंदे, विश्वास अहिरे, रईस फारुकी आदींनी चर्चेत सहभाग घेतला.