Breaking News

बोगस बियाणे बाबत शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारीमुळे कृषिमंत्री दादा भुसे आक्रमक (शिवशक्ती टाइम्स न्युज )

युरिया खतावर लिंकिंग करणाऱ्यांवर कृषी विभागाने लक्ष ठेवण्याचे आदेश
शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज पुरवठा झाला पाहिजे – कृषिमंत्री दादा भुसे

(शिवशक्ती टाइम्स न्युज )

मुंबई : (शिवशक्ती टाइम्स न्युज -आनंद दाभाडे ) – महाराष्ट्राचे राज्यांचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून खतं आणि बियाणांसंदर्भात शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारीमुळे अधिकाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय कृषिमंत्री कधी वेश बदलून खतांच्या दुकानात जातात तर कधी ते सदोष बियाणं प्रकरणी कारवाईची भाषा करतात. युरिया खतावर लिंकिंग करणाऱ्यांवरहि कृषी विभागाने लक्ष ठेवण्याचे आदेश देऊन दोषी लोकांवर तातडीनं कारवाई करण्याचं आश्वासन कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिलं आहे. शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज पुरवठा झाला पाहिजे यासाठी दादा भुसे यांचे प्रयन्त चालू आहे. युरियावर लिंकिंग करणाऱ्या संबंधीत दुकानासह कृषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी आक्रमक भूमिका कृषी मंत्रींनी घेतली आहे.

सोयाबीन बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी काही शेतकऱ्यांनी दादा भुसे यांच्याकडे केल्या आहेत. याची पाहणी सुद्धा मा. दादा भुसे यांनी स्वतः शेतात जाऊन केली होती. कृषी विद्यापीठ परभणीचे सोयाबीनचं संशोधन करणारे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी यांची एक समिती स्थापन करून चौकशीसाठी नेमली आहे. महाबीजचे बियाणे उगवले नसेल तर शेतकर्‍यांना तातडीने नवं बियाणं दिले जाईल. इतर बियाणांबाबत चौकशी अहवाल आल्यानंतर शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली जाईल आणि कंपन्यांवर कारवाई देखील केली जाईल, असं आश्वासन दादा भुसे यांनी दिलं आहे.

About Shivshakti Times

Check Also

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न शिवशक्ती टाइम्स न्यूज …

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर

राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नाही राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध …

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना मोफत बियाणे, खते वाटप

मालेगाव तालुका ॲग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीचा उपक्रम स्तुत्य : कृषी मंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *