नाशिक दि. २४ (ब्युरो चिफ – प्रतिनिधी):- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याविषयी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढलेल्या अप शब्दांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुतळ्यास जोडे मारून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची पुढेपुढे करून आमदारकी मिळविलेल्या गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. पडळकर यांनी शरद पवार यांची जाहीर माफी मागावी अन्यथा नाशिक जिल्ह्यात पडळकरांना येऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी यावेळी दिला.
खा. शरद पवार यांच्यावर खोटेनाटे आरोप करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी यावेळी बोलतांना केली.
गोपीचंद पडळकर यांनी खा.शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांचा निषेध करत असून त्यांनी केलेले आरोप मिडियाचे लक्ष वेधण्यासाठी असल्याचा आरोप कोंडाजीमामा आव्हाड यांनी केला.
यावेळी भारतीय जनता पार्टी व आ. गोपीचंद पडळकर यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात येत होत्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, कोंडाजी आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, विष्णुपंत म्हैसधुणे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, अर्जुन टिळे, महेश भामरे, महिला अध्यक्षा अनिता भामरे, विद्यार्थी अध्यक्ष नंदन भास्करे, मुख्तार शेख, राजाराम धनवटे, बाळासाहेब गीते, शंकर मोकळ, मनोहर कोरडे, समाधान तिवडे, सचिन कलासरे, निवृत्ती कापसे, सोमनाथ बोराडे, सुरेश आव्हाड, अनिल परदेशी, राजेंद्र शेळके, गणेश गायधनी, संदीप अहिरे, भुषण शिंदे, अजय पाटील, निलेश भंदुरे, विकास सोनवणे, योगेश ठुबे, भावेश निर्वाण, प्रतिक पालकर, पुष्पा राठोड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. गोपीचंद पडळकर यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कोंडाजी आव्हाड, डॉ. सयाजी गायकवाड, नानासाहेब महाले, अर्जुन टिळे, अनिता भामरे आदी दिसत आहेत.