Breaking News

सदोष वीज बिल विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अभियंताना निवेदन

सदोष वीज बिल विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अभियंताना निवेदन

नाशिक (दि.२४ जून) – लॉकडाऊनच्या काळात बंद केलेले मीटर रीडिंग जून महिन्यात सुरु केल्यानंतर नाशिक मधील घरगुती व व्यावसायिक विद्युत ग्राहकांना चुकीच्या स्लॅबचे वीज बिल देण्यात आले असून ते तातडीने दुरुस्त करून अचूक वीजबिल वाटप करण्यात यावे असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले व शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता दीक्षित यांना दिले.

मा.महोदय,

कोविड-१९ महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च ते जून-२०२० पर्यंत सर्वच ठिकाणी लॉक-डाऊन पाळण्यात आला आणि त्यामुळेच आपल्या महावितरणच्या यंत्रणेला ह्या  कालावधीत प्रत्यक्ष ग्राहकांकडे जाऊन मीटर रिडिंग घेता आले नाही. महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना अॅपद्वारे ऑनलाईन भरण्याचे आवाहन देखील केले होते परंतु बहुतांश नागरिकांना ते शक्य झाले नाही किंवा करता आले नाही. यामुळे महावितरण कंपनीकडून मागील तीन महिन्यांचे सरासरी वापराच्या आधारावर अंदाजे बिल (मीटर रिडिंग न घेता ) मे महिन्याअखेर दिले आणि त्यानंतर आता माहे जून-२०२० मध्ये तुम्ही प्रत्यक्ष ग्राहकांच्या मीटर वरून रिडिंग घेतले. (जे ३ महिन्याचे एकूण युनिट वापर आहे).

        सध्याच्या वीज बिल आकारणी तक्त्यानुसार महावितरण कंपनी 0 ते 100 , 100 ते 300 , 300 ते 500 आणि 500 ते 1000 आणि त्यापुढे.. असे घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी वेगवेगळे युनिट दर आकारते. महावितरण ने ३ महिन्याचे रिडिंग एकाच महिन्यात घेऊन ते मोजल्याने ग्राहकांच्या  दरमहिन्यात 0 ते 100 दरम्यान येणारे युनिट तीन महिन्याच्या एकत्र रिडिंगमुळे 300, 500 व 1000 युनिटच्या पुढे गेले आहे. 0 ते 100 च्या पुढील युनिटकरिता जास्त दर असल्याने ग्राहकांच्या विजबिलाचा आकडा साहजिकच फुगून आला आहे. तसेच मागील तीन महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने व्यावसायिक वीज वापर झालेला नाही. यामुळे महावितरण कंपनीने ३ महिन्यात ग्राहकांचे झालेले युनिट हे १ महिन्यांच्या सरासरीनुसार काढावे जे 0 ते 100 युनिटच्या आत येतील व  त्याप्रमाणे सुधारित बिले तातडीने नागरिकांना देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

          याप्रसंगी मुख्तार शेख, गौरव गोवर्धने, बाळासाहेब गीते, शंकर मोकळ, अनिल परदेशी, राजेंद्र शेळके, समाधान तिवडे, सचिन कलासरे, योगेश ठुबे, अजय पाटील, निलेश भंदुरे,  विकास सोनवणे, भावेश निर्वाण, नितीन लासुरे, जितेंद्र जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न शिवशक्ती टाइम्स न्यूज …

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर

राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नाही राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध …

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना मोफत बियाणे, खते वाटप

मालेगाव तालुका ॲग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीचा उपक्रम स्तुत्य : कृषी मंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *