कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबादास खैरे यांचा वाढदिवस सामाजिक कार्याने साजरा करण्याचे आवाहन
(शिवशक्ती टाइम्स न्युज -आनंद दाभाडे )
नाशिक (दि.२५ जून) – जागतिक महामारी कोरोनामुळे सर्वसामान्याचे जनजीवन विस्कळीत झाले असूनतीन महिन्यानंतरही जनजीवन रुळावर आलेले नाही. नाशिक शहरात कोरोना रुग्णांची शृंखला दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाच्या या महामारीमुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे हे त्यांचा वाढदिवस साजरा करणार नाही. मित्रपरिवार व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले सर्व कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहे.
अंबादास खैरे यांनी आपल्या मित्रपरिवार, हितचिंतक व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, शहरात कुठेही वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होल्डिंग अथवा बॅनर लावू नये तसेच सार्वजनिक ठिकाणी घेण्यात येणारे सर्व कार्यक्रम रद्द करावे व त्याएवजी समाजिक कार्यक्रम घेण्यात यावे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डीस्टसिंग पाळणे गरजेचे असल्याने त्यांनी आपला अभीष्टचिंतन सोहळाही रद्द केला आहे. त्याकारणाने कोणीही प्रत्यक्षात येऊन शुभेच्छा देण्याची तजवीज करू नये. कृपया आपल्या सदिच्छा, प्रेम व आशीर्वाद फोनच्या माध्यमातून द्याव्यात. कोरोनामुळे सद्यपरिस्थिती वाईट असल्याने सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे घरी राहा, सुरक्षित रहा. आपण आपला व आपल्या परिवारासह हितचिंतकाचा कोरोनापासून बचाव करा असे आवाहन अंबादास खैरे मित्रपरिवार व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी नाशिक शहर यांनी केले आहे.