Breaking News

रविवारपासून केशकर्तनालये उघडण्यास परवानगी; मात्र अटीशर्तींचे तंतोतंत पालन होणे आवश्यक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे (शिवशक्ती टाइम्स न्युज)

रविवारपासून केशकर्तनालये उघडण्यास परवानगी; मात्र अटीशर्तींचे तंतोतंत पालन होणे आवश्यक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे (शिवशक्ती टाइम्स न्युज)

नाशिक दि. 26 जून 2020 (जिमाका, वृत्तसेवा) :
टप्पेनिहाय लॉकडाउन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करणे यासाठी राज्य शासनाने मिशन बिगीन अगेनच्या चौथ्या टप्प्यामध्ये काही अटी-शर्तींच्या अधिन राहून जिल्ह्यात केशकर्तनालये, सलून, स्पा आणि ब्युटी पार्लरची दुकाने २८ जून २०२० पासून सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सुरज मांढरे यांनी दिली आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी आज निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे की, जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांमध्ये केशकर्तनालये, सलुन, स्‍पा आणि ब्युटी पार्लर्स काही अटी शर्तींच्या अधीन राहून सुरू करता येतील. या दुकानांमध्ये केस कापणे, केस रंगवणे, व्हॅक्सिंग आणि थ्रेडिंग इत्यादी सेवा देता येतील. मात्र, त्वचा संबंधित कोणत्याही उपचार पद्धतींची सेवा देता येणार नसल्याचेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी या आदेशात नमूद केले आहे.

या दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ग्लोज, मास्क व इतर अनुषंगिक आवश्यक वैयक्तिक स्वच्छतेच्या साधनांचा वापर करणे अनिवार्य आहे. ग्राहकांना दिलेल्या प्रत्येक सेवेनंतर खुर्ची सॅनिटाईज करणे, दर दोन तासांनी सर्व दुकानाचे क्षेत्र व मजले सॅनिटाईज करणे आवश्यक आहे. प्रत्येक ग्राहकासाठी फक्त एकदाच वापर होतील असे टॉवेल्स व नॅपकीन वापरणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे जे साहित्य अथवा उपकरणे एका वापरानंतर टाकून देणे शक्य नसेल असे उपकरणे प्रत्येक सेवेनंतर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करणे अत्यावश्यक आहे. तसेच राज्य शासनाकडून आलेल्या सूचना ग्राहकांच्या माहितीसाठी स्पष्टपणे दिसेल अशा ठिकाणी लावण्याचेही श्री. मांढरे यांनी आदेशात नमूद केले आहे.

प्रशासनाच्या संबंधित आदेशाचे कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास; त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ भारतीय दंड संहिता १८६० (४५) च्या 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानण्यात येईल. त्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी या आदेशात नमूद केले आहे.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.