Breaking News

अंबादास खैरे यांचा वाढदिवस शहरात विविध सामाजिक कार्याने साजरा (शिवशक्ती टाइम्स न्यूज )

अंबादास खैरे यांचा वाढदिवस शहरात विविध सामाजिक कार्याने साजरा

नाशिक (दि.२७ जून)   शिवशक्ती टाइम्स न्यूज – नाशिक ब्युरो चीफ  – जागतिक महामारी कोरोनामुळे सर्वसामान्याचे जनजीवन विस्कळीत झाले असून तीन महिन्यानंतरही जनजीवन रुळावर आलेले नाही. नाशिक शहरात कोरोना रुग्णांची शृंखला दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाच्या महामारीमुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांचा वाढदिवस युवक पदाधिकारी व मित्रपरिवारांनी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला.

कोरोना विषाणूमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान विस्कळीत झाल्याने  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला व वाढदिवसानिमित्त शहरात कुठेही वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होल्डिंग अथवा बॅनर लावू नये तसेच सार्वजनिक ठिकाणी कुठलेही कार्यक्रम घेण्यात येऊ नये त्याएवजी समाजिक कार्यक्रम घेण्यात यावे असे आवाहन युवक पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवाराला केले होते. त्यानुसार शहरात विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले.

पंचवटी परिसरात त्रिमूर्ती नगर मित्र मंडळाच्या वतीने संदीप गांगुर्डे यांनी वृक्षरोपण, नवीन आडगाव नाका येथे अनिकेत पाटील व चेतन इंगोले यांनी रक्तदान शिबिर, नानावली परिसरात युवक सरचिटणीस सागर बेदरकर व विभाग अध्यक्ष नदीम शेख यांनी रक्तदान शिबिर, अर्सेनिक अल्बम टॅबलेट – ३० चे वाटप व कोविड योद्धाच्या कामाचे प्रोत्साहन म्हणून सन्मानपत्र वाटप, सिडको परिसरात राहुल कमानकर, हर्षल चव्हाण, करण आरोटे व अक्षय परदेशी यांनी नागरिकांना अर्सेनिक अल्बम टॅबलेट – ३० चे वाटप, सिडको परिसरात जंतुनाशक फवारणी, दुकान व्यावसायिकव बँक कर्मचाऱ्यांना फेशियल मास्क वाटप व वृक्षारोपण आदि सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले.

या प्रसंगी संदिप (आप्पा) गांगुर्डे, संदीप खैरे , नाना पवार, किरण पानकर, कदमसिंग सोळंके, गणेश बोडके, रामदास शिंदे , स्वप्नील फुले ,राकेश शेवाळे ,अशोक पाटील, शाम जोशी ,प्रवीण खैरे, सचिन जोशी, राज रंधवा, रोहित जाधव, नदीम शेख, सुनील घुगे आदींसह पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

भुकेल्याची भुक भागविण्याचे महत्वपूर्ण काम करते शिवभोजन केंद्र : कृषीमंत्री भुसे

सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी अल्प दरासह संकट …

माळमाथ्यावरील रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांनी केले खडयात वृक्षरोपण

मालेगाव : प्रतिनिधी  माळमाथ्यावरील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव या गावातील रस्त्यांची जीवघेणी दुरावस्था …

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश केंद्र सरकारने दिला खत सबसिडी वाढविण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published.