महाराष्ट्राचे लोकप्रिय कृषिमंत्रि दादाजी भुसे साहेब यांचा मालेगांव फोटोग्राफर असोशियशन कडून कोविड योद्धा म्हणून ट्रॉफी आणि शाल देऊन गौरव
मालेगाव – (शिवशक्ती टाईम्स न्यूज) संपादक-जयेश रंगनाथ दाभाडे –
कोरोना महामारीने देशात थैमान घातले असताना कोव्हिडं 19 या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने लॉक डाऊन केले होते. विषाणूवर औषध नसल्याने सर्वांनाच भीतीने ग्रासले आहे. व कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले होते.
या संकटकालीन परिस्थितीत मालेगांव तालुक्यातील जनतेला महाराष्ट्राचे लोकप्रिय कृषिमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप आणि अन्न धान्य वाटप हे त्यांच्या टिम करून मदतीचा हात दिला व नागरिकांचे मनोधैर्य वाढवले. या त्यांच्या सामाजिक उपक्रमाचे आपणही ऋणव्यक्त/ आभार व्यक्त केले पाहिजे म्हणून ….मालेगांव फोटोग्राफर असोशियशन कडून दादाजी भुसे साहेब यांना कोविड योद्धा म्हणून ट्रॉफी आणि शाल देऊन गौरविण्यात आले.
या बद्दल अभिनंदन व आपल्या सेवेप्रति कृतज्ञता. तसेच या पूर्वीही आपण समाजसेवा करतच होता, यापुढेही आपल्या हातून अनेक समाजपयोगी कार्य घडो यासाठी शुभेच्छा मालेगांव फोटोग्राफर असोसिएशन वतीने देण्यात आल्या.
यावेळी सुनील खैरनार…तुषार जाधव.. बबलू शेवाळे…. किरण सोनावणे… किशोर दाभाडे…….. गणेश जंगम….. किशोर बच्छाव…. बाळा अमृतकर….अभिजित चौधरी…. रवींद्र शेवाळे….दिलीप महाजन….सुरेश सोनावणे उपास्थीत होते.