Breaking News

जिल्ह्यात आजपर्यंत २ हजार ११९ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज – कोरोना दि. २९ जून, २०२० :सकाळी ११ : ०० वाजता पॉझिटीव्ह अपडेट्स – शिवशक्ती टाइम्स न्यूज

जिल्ह्यात आजपर्यंत २ हजार ११९ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज –

सद्यस्थितीत १ हजार ५८६ रुग्णांवर उपचार सुरू  (शिवशक्ती टाइम्स न्यूज )

नाशिक, दि. २९ जून, २०२० (जिमाका वृत्तसेवा) :  उपसंपादक – आनंद दाभाडे 

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ हजार ११९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १ हजार ५८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत २२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ६९, चांदवड ०७, सिन्नर ५९, देवळा २, दिंडोरी २२, निफाड ५९, नांदगांव १६,येवला ४१, त्र्यंबकेश्वर १२, कळवण ०१ ,बागलाण १५, इगतपुरी २७, मालेगांव ग्रामीण २० असे एकूण ३५० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून सुरगाणा, पेठ, या दोन तालुक्यात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण नाही. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ३९ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १५८ तर जिल्ह्याबाहेरील ३९ असे एकूण १ हजार ५८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ हजार ९३० रुग्ण आढळून आले आहेत.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण ४२ ,नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ९९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ७३ व जिल्हा बाहेरील ११ अशा एकूण २२५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

◼️३ हजार ९३० कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ हजार ११९ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात १ हजार ५८६ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

(वरील आकडेवारी आज सकाळी १०.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

About Shivshakti Times

Check Also

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची विधानभवनात गृहमंत्र्यांसोबत बैठक संपन्न

पोलिस पाटीलांचे मानधन वाढीसह अनेक प्रश्न मार्गी लागणार शिवशक्ती टाइम्स न्यूज महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील …

करोनाचा कहर… इंदोर मधील ज्वेलरी शॉपमधील ३१ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह

इंदोर मधील ज्वेलरी शॉपमधील ३१ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह ; खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचा शोध सुरू…… शिवशक्ती …

शिकार केलेल्या काळविटाचं मटण खाणं पडलं महागात; काय आहे नेमकं प्रकरण?

सोलापूर (प्रतिनिधी-युसूफ पठाण ) : सोलापुरात काळविटाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याकडून मटण विकत घेणे दोघांना चांगलेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *