Breaking News

कराची स्टॉक एक्सेंजवर दहशतवादी हल्ला – पोलिसांकडून चार आतंकी ढेर (या हल्ल्यात दोन नागरिकांचाही मृत्यू ) – शिवशक्ती टाईम्स न्यूज

पाकिस्तान कराची स्टॉक एक्सेंजमध्ये आज झाला दहशतवादी हल्ला

पाकिस्तान पोलिसांकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा आला. – शिवशक्ती टाईम्स न्यूज

कराची :  आज दि. २९ जून रोजी  कराची येथील पाकिस्तान स्टॉक एक्सेंचवर दहशतवादी हल्ला झाला आहे. आर्मी न्यूज रिपोर्ट नुसार  सोमवारी चार दहशतवाद्यांनी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत प्रवेश केला दहशतवाद्यांनी  इमारतीच्या मेन गेटवर ग्रेनेड हल्ला केला होता आणि त्यानंतर अंदाधुंद गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात सहा जण ठार झाल्याची माहिती आहे.. तसेच सुरक्षा रक्षक आणि नागरिकांसह 11 जण जखमी झाले आहेत.जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यासह स्टॉक एक्स्चेंजमध्ये अडकलेल्या कर्मचार्‍यांना मागील दारातून बाहेर काढले आहे. कराचीचे महानिरीक्षक म्हणाले की परिस्थिती नियंत्रणात असून सर्व दहशतवादी ठार झाले आहेत. रेंजर्स आणि पोलिस कर्मचारी इमारतीत दाखल झाले असून शोध मोहीम सुरू आहे. कराचीचे आयजी म्हणतात की हल्लेखोर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी हल्ला केला आणि बॅग ठेवली होती ज्यात स्फोटके असू शकतात. सिंध रेंजरच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे की, ‘हल्ल्या केलेल्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून क्लियरेंज ऑपरेशन सुरु आहे.’ तसेच पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘दहशतवादी ज्या गाडीतून आले होते, ती गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.’

About Shivshakti Times

Check Also

मालेगावी १० तलवारींसह चौघे ताब्यात

शहर पोलिस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी शहरातील रमजानपुरा …

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *