पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग व अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली
विशेष पोलीस पथकाची धडक कारवाई
रुपये ८,३९,९००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त – ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मालेगाव – (शिवशक्ती टाइम्स न्यूज) संपादक – जयेश रंगनाथ दाभाडे : पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग व अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहा. पोलीस निरीक्षक सागर कोते, सपोनि तुषार गरुड, पोशि. तुषार अहिरे, पोशि. अभिजित साबळे, पोशि. दिनेश शेरावते, पोशि. ३०३२ सानप, तसेच पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री. रणजित रामघरे अशांनी दि. २९ रोजी मुंबई आग्रा महामार्गावर टेहेरे गावाजवळील कौळाणे गावात जाणाऱ्या रोडलगत असलेल्या इसम नामे नरेंद्र भगवान शेवाळे यांच्या पत्र्याच्या शेडजवळ इसम नामे १) मोहम्मद गुफरान अब्दुल सुभान (दलाल) वय-६५, रा. गोल्डन नगर, मालेगाव २) शितल सुभाषचंद लोहाले (धान्य विकत घेणारा) वय-४५, रा. सावता नगर, संगमेश्वर, मालेगाव ३) अब्दुल इसाक अब्दुल सत्तर (दलाल) वय – ३२, रा. मेहबी नगर, पवारवाडी, मालेगाव ४) शेख बु-हान शेख (वाहन मालक) वय-५०, रा. गवळी वाडा, मर्चंड नगर, मालेगाव ५) शेख ईसार शेख इसाक (चालक) वय-३०, रा. देवीचा मला, पवारवाडी, मालेगाव ६) फारूक खान रमजान खान (चालक) वय – ३५ रा. हुडको कॉलनी, ७) सय्यद जाफर सय्यद सलीम (हमाल) वय-२५, रा. इंदिरा नगर, गवळी वाडा, मालेगाव ८) निसार शेख (धान्य विकणारा फरार) ९) जाफर शेठ (धान्य विकणारा फरार) , १०) नरेंद्र भगवान शेवाळे (धान्य साठवणूक करणारा) फरार ११) कुंदन केदार (पिकअप वाहन मालक ) फरार रा. मालेगाव कॅम्प हे जीवनावश्यक स्वस्त धान्य दुकानातील धान्य अपहार करून वाहतूक करून साठवणूक करताना एकूण १३९ पोतें २,२२,४००/- रुपये किमतीचे तांदूळ, ६,००,००० रुपये किमतीचे दोन पीकअप वाहन व १७५०० रुपये किमतीचे एकूण ६ मोबाइल असा एकूण ८, ३९, ९०० रुपयाच्या मुद्देमाल मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध किल्ला पोलीस ठाणे मालेगाव जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५चे कलम ३ व ७ मोटार वाहन कायदा कलम १९२ तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.