Breaking News

मालेगाव महापालिका प्रशासनाच्या मसगा कोविड सेंटर येथुन 10 जणांची कोरोनामुक्ती (शिवशक्ती टाइम्स न्यूज )

 मालेगाव महापालिका प्रशासनाच्या मसगा कोविड सेंटर येथुन 10 जणांची कोरोनामुक्ती – शिवशक्ती टाइम्स न्यूज 

मालेगाव मनपा : (उपसंपादक – आनंद दाभाडे ) मालेगाव महापालिकेने मसगा महाविद्यालय येथे तयार केलेल्या सी.सी.सी व डी.सी.सी.एच. सेंटर येथुन अनुक्रमे 8 व 2 अशा एकुण 10 व्यक्तींनी औषध उपचारास योग्य प्रतिसाद दिल्याने व आज घडीला कोणतेही लक्षण नसल्याने नवीन डिस्चार्ज धोरणानुसार कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले.
मालेगाव महापालिकेमार्फत मसगा महाविद्यालय येथे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर 70 बेड चे सी.सी.सी व 30 बेड चे डी.सी.सी.एच. असे पुर्ण 100 बेड चे कोविड सेंटर तयार करण्यात आलेले आहे. आयुक्त त्रंबक कासार यांनी महापालिकेकडुन येथे ऑक्सीजन सह सर्व अद्ययावत वैद्यकिय सुविधा तज्ञ डॉक्टरांसह उपलब्ध केलेल्या असुन नोडल ऑफिसर व बालरोग तज्ञ डॉ.पुष्कर आहिरे यांच्या नियुक्तीसह फिजीशियन डॉ.अभय निकम, डॉ.अविनाश आहेर, इत्यादी तज्ञ डॉक्टर सिव्हिल चे डॉ.हितेश महाले यांच्या आणि आरोग्य अधिकारी सपना ठाकरे यांच्या अधिपत्याखाली आणि मार्गदर्शनात उत्तम काम करीत आहेत. त्यामळे आजपर्यंत या सेंटर मधुन मोठया प्रमाणात रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. येथील प्रत्येक रुग्णांची आय.डी. सह स्वतंत्र फाईल ठेवण्यात आली असुन शासनाच्या निर्देशानुसार औषधोपचार करण्यात येतात. डिस्चार्ज पुर्वी विशेषत:एकुण उपचारांच्या दिवसापैकी 7,8,9 व्या दिवशी संबधीत रुग्णांचे SPO2, टेम्परेचर, श्वसनास काही त्रास आहे का इत्यादी चेकअप केले जाते. बाधित रुग्णांची कोरोनामुक्ती होण्यात मनपा प्रशासनातील अधिकारी – कर्मचारी डॉक्टर यांच्यासह इतर कर्मचारी वर्ग जसे वॉर्डबॉय, आया,नर्स,सफाई कामगार,विद्युत व पाणी पुरवठा कर्मचारी यांचा उल्लेखनिय खारीचा वाटा आहे असे गौरवोद्गार कोरोनामुक्त होणारे नागरीक डिस्चार्जवेळी आवर्जुन सांगतात. हे यश खरेच मनपा प्रशासनाच्या वर्ग-1 ते वर्ग-4 अशा सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या टिमवर्क मुळेच शक्य झालेआहे. आजमितीस एकुण 10 जणांना कोरोनामुक्त करुन मनपाच्या रुग्णवाहिकेतुन घरी सोडण्यात आले. यात एक 60 वर्षाचे बाबा आणि 62 वर्षाच्या आजींसह 6 व 10 वर्षाचे दोन बालक तर अनुक्रमे 34,40,24,43,30 वर्षाचे युवक आणि 37 वर्षिय महिलेचा समावेश होता. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा येथील डॉक्टर, नर्स,इतर कर्मचारी यांनी फुल देऊन शुभेच्छा दिल्या तर सर्व कोरोनामुक्त रुग्णांनी कृतज्ञतेसह पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय,विद्युत व सफाई कर्मचारी यांचा सत्कार करुन महापालिकेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी नोडल अधिकारी डॉ.पुष्कर अहिरे, डॉ.संदिप खैरणार,इन्चार्ज सिस्टर विनया भालेकर, ब्रदर भरत देवरे, पाणी पुरवठा इंजिनियर जयपाल त्रिभुवन, विद्युत कर्मचारी संदिप काळुंखे, वॉर्डबॉय फुरखान पठाण, आरीफ, मो.साबिर,एजाज, हुजेर यांच्यासह सफाई व इतर वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

जनसंपर्क अधिकारी
मालेगाव महानगरपालिका मालेगाव.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.