Breaking News

डीझेलच्या दरात होणाऱ्या दरवाढीमुळे ट्रान्सपोर्ट व्यवसाय अधिक अडचणीत; दरवाढ मागे घ्या अन्यथा आंदोलन

डिझेलच्या दरात कपात करण्याची नाशिक ट्रान्सपोर्ट व गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशनची केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्याकडे मागणी

नाशिक,दि.२९ जून (नाशिक प्रतिनिधी-राजेश सोनवणे ):- डिझेलच्या दरात दिवसेंदिवस होत असलेली वाढ अत्यंत चिंताजनक असून अगोदरच अडचणीत सापडलेला ट्रान्सपोर्ट व्यवसाय अधिक अडचणीत सापडला असून डीझेलची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व नाशिक गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी.एम.सैनी यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. तसेच येत्या १ जुलै २०२० डीझलदर वाढीचा निषेध म्हणून एक दिवसीय निषेध म्हणून काळया पट्या बांधून काम करणार येईल जर काही निर्णय होत नसेल आणि भाव वाढ माघे घेतली नाही तर प्रसंगी आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

नाशिक ट्रान्सपोर्ट व गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशात आणि राज्यात कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतांना उद्योग, व्यवसाय व सामान्य नागरिकांचे अर्थचक्र  पूर्णपणे कोलमडले आहे. आशा परिस्थितीत गेल्या वीस दिवसाहुन अधिक काळापासून डिझेलच्या दरात सातत्याने दरवाढ होत असून डिझेल दरवाढीने ऐतिहासिक उंची गाठली आहे. याचा सर्वात मोठा परिमाण म्हणजेसंपूर्ण देशातील ट्रान्सपोर्ट व्यवसाय अडचणीत सापडला आहे.

सातत्याने डिझेलमध्ये दरवाढ होत असल्याने वाहतूक खर्च अधिक वाढत आहे. त्याचा वस्तूच्या किमतीवर होत असून महागाई अधिक वाढून नागरिक देखील अडचणीत येणार आहे. एकतर अगोदरच कोरोनाच्या संकटाने अनेकांच्या उपजीविकेवर परिणाम होत असून त्यात महागाईची झळ बसल्यास उद्योग व्यवसाया सोबतच नागरिकांच्या रोषाला शासनाला सामोरे जावे लागणार आहे.बऱ्याच वेळा आम्ही कळविले आहे की वाहतूक दारांचे व कारखान्यांचे,इतर माल वाहतूक कंत्राट हे वार्षिक केलेले असते त्या साठी तीन ते चार महिन्यात नियोजित दर वाढ असेल तर आगोदर आम्हाला कारखान्यांना कंत्राट नियम अटी मध्ये टाकता येते परंतु रोजच दरवाढ होत असेल तर ते त्वरित थांबवावे असे म्हटले आहे.

देशातील ट्रान्सपोर्ट व्यवसाय एकीकडे अनेक अडचणींचा सामना करत असतांना दिवसेंदिवस त्या अडचणी कमी होण्यापेक्षा त्या वाढतच चालल्या आहे. मात्र शासनाला याबाबत कुठलही सोयर सुतक नसल्याचे दिसत आहे. देशातील ट्रान्सपोर्ट व्यवसायातील अडीअडचणी बाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा होऊन देखील शासन जर त्याकडे दुर्लक्ष करणार असेल तर वाहतुकदारांना रस्त्यावर उतरण्याशिवाय कुठलाही पर्याय खुला राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने अडचणीत सापडलेल्या या व्यवसायाला वाचविण्यासाठी आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने डिझेल दरवाढ तातडीने मागे घेऊन दिलासा द्यावा अशी मागणी ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष राजेंद्र फड व पी.एम.सैनी यांनी केली आहे.

About Shivshakti Times

Check Also

भुकेल्याची भुक भागविण्याचे महत्वपूर्ण काम करते शिवभोजन केंद्र : कृषीमंत्री भुसे

सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी अल्प दरासह संकट …

माळमाथ्यावरील रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांनी केले खडयात वृक्षरोपण

मालेगाव : प्रतिनिधी  माळमाथ्यावरील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव या गावातील रस्त्यांची जीवघेणी दुरावस्था …

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश केंद्र सरकारने दिला खत सबसिडी वाढविण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published.