Breaking News
वनविभाग परिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांना निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक तालुकाध्यक्ष गणेश गायधनी व शिष्टमंडळ दिसत आहे.

बिबट्याच्या हल्ल्यासंबधी वनविभागाने तातडीने पाऊले उचलण्याबाबत राष्ट्रवादीचे निवेदन ( शिवशक्ती टाइम्स न्यूज )

बिबट्याच्या हल्ल्यासंबधी वनविभागाने तातडीने पाऊले उचलण्याबाबत राष्ट्रवादीचे निवेदन ( शिवशक्ती टाइम्स न्यूज )

नाशिक दि. २९ (प्रतिनिधी-आनंद दाभाडे):- नाशिक तालुक्यातील पूर्व भागात बिबट्याचा मानवी वस्तीत भरदिवसा मुक्त संचार होत असून यात प्राणघातक हल्ले होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने योग्य  पाऊले उचलावीत असे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक तालुकाध्यक्ष गणेश गायधनी व त्यांच्या शिष्टमंडळाने वनविभाग परिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांना दिले.

          नाशिक तालुक्यातील पूर्व भागात बिबट्यांचा मुक्तसंचार होत असून यात बिबट्याने अनेकांवर हल्ले केले आहे. गेल्या बारा दिवसामध्ये या भागात सहा दुर्दैवी घटना घडल्या असून यात हिंगणवेढे गावात लहान मुलगा रस्ताने चालत असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले दुसरी घटना दोनवाडे गावात अंगणात खेळत असलेल्या लहान मुलास बिबट्याने शेतात नेऊन ठार केले तिसरी घटना बाभळेश्वर गावात लहान मुलीवर बिबट्याने हल्ला केला व यात ती मरण पावली तर दि.२८ रोजी समानगावात लहान मुलगा घरासमोरील अंगणात खेळत अचानक बिबट्याने हल्ला केला व यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्नालायाय उपचार सुरु आहे.

नाशिक मधील शेत परिसरात व मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढला असून अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात बिबट्यांचे दर्शन नित्याचेच झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतात मादी बिबट्यांनी बछाड्यांना जन्म दिला असून त्या बछाड्यांच्या संरक्षणासाठी मादी बिबट्या शेतकऱ्यांवर हल्ला करत आहे. यामुळे वनविभागाने तातडीने योग्य ती पाऊले उचलून मानवी वस्तीतील बिबट्याचा वावर थांबवावा तसेच नाशिक तालुक्यातील पूर्व भागात पिंजरा लावून बिबट्यांना जेलबंद करावे असे निवेदनात म्हटले आहे.

          यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष संदेश टिळे, अक्षय कहांडळ, अॅड. नवनाथ कांडेकर, अनिल पेखळे, विशाल गायधनी, निखील सातपुते, यश धोंगडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

वनविभाग परिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांना निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक तालुकाध्यक्ष गणेश गायधनी व शिष्टमंडळ दिसत आहे.

About Shivshakti Times

Check Also

भुकेल्याची भुक भागविण्याचे महत्वपूर्ण काम करते शिवभोजन केंद्र : कृषीमंत्री भुसे

सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी अल्प दरासह संकट …

माळमाथ्यावरील रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांनी केले खडयात वृक्षरोपण

मालेगाव : प्रतिनिधी  माळमाथ्यावरील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव या गावातील रस्त्यांची जीवघेणी दुरावस्था …

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश केंद्र सरकारने दिला खत सबसिडी वाढविण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published.