Breaking News

7 महिण्याच्या चिमुरडीची आई व दोन भावंडांच्या कुटुंबासह कोरोनामुक्त

लहान शिशुसह मोठया प्रमाणात होणारी कोरोना मुक्ती मालेगाव महापालिका प्रशासनाचे यश – नितीन कापडणीस उपायुक्त (विकास)

शिवशक्ती टाइम्स न्यूज

मालेगाव मनपा (संपादक – जयेश रंगनाथ दाभाडे ): मालेगाव महापालिकेने मसगा महाविद्यालय येथे तयार केलेल्या डी.सी.सी.एच. सेंटर येथुन आज दि.30 जुन अवघ्या 7 महिण्याच्या प्रगती नामक चिमुरडीने आई व दोन लहान भावंडासह कोरोनावर मात करुन कोरोनामुक्त होत कोरोनाला टाटा बाय बाय केल्याने मालेगाव महापालिका प्रशासनाच्या उत्तम आरोग्य सेवेचा प्रत्यय नागरीकांना पुन्हा पुन्हा येत आहे.
आयुक्त त्रंबक कासार यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण मालेगाव महापालिका प्रशासनाच्या नियोजन बध्द कार्यक्रमानुसार मनपा आरोग्य विभागाव्दारे कोरोनाबाधित रुग्णांना उत्तमोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करुन देऊन नवीन डिस्चार्ज धोरणानुसार नागरीकांना कोरोनामुक्त करण्याच्या यशस्वी मालेगाव पॅटर्न ची घोडदौड सुरुच असुन आज अवघ्या 7 महिण्याच्या बालिकेस 25 वर्षीय आई व अनुक्रमे 2 व 4 वर्षीय भाऊ बहिणीस आणि 63 वर्षीय वयोवृध्दांसह सर्व व्यक्तींनी सकारात्मक वातावरणात औषध उपचारास योग्य प्रतिसाद दिल्याने व आज घडीला कोणतेही लक्षण नसल्याने कोरोनामुक्त झाल्याने मनपा उपायुक्त नितीन कापडणीस यांच्यासह उपस्थित सर्वांनी फुलांची उधळन करीत आरोग्याच्या शुभेच्छांसह उक्त कोरोनामुक्त कुटुंबास घरी सोडले. मनपा प्रशासन व आरोग्य विभागाचे यश व कार्य उल्लेखनिय आहे असे उद्गार उपायुक्त विकास नितीन कापडणीस यांनी यावेळी काढले.
कोरोनामुक्त होऊन घरी परत जातांना उक्त कुटुंबातील मातेच्या चेहऱ्यावर मालेगाव मनपा प्रशासन व वैद्यकीय चमुने केलेल्या अथक प्रयत्नांचे भाव कृतज्ञतेने ओसंडुन निघाले. कारण उक्त 7 महिण्याच्या बालिकेस श्वसनास त्रास जाणवत होता आणि तिची तब्बेत प्रथम खालावत होती तिचे ऑक्सिजन सॅच्युरेशन अवघे 58 इतके असल्याने बालरोग तज्ञ डॉ.पुष्कर आहेर व त्यांचे सहकरी वैद्यकीय पथकाने बाळाची खुप काळजी घेतली. याबाबत मनपा प्रशासन जातीने प्रत्येक ठिकाणी लक्ष देत होते तसे निर्देश आयुक्त कासार यांनी सर्वांना दिले होते.
यावेळी उपायुक्त (विकास) नितीन कापडणीस, आरोग्य अधिकारी सपना ठाकरे, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी, डी.सी.सी.एच.सेंटर चे नोडल अधिकारी तथा बालरोग तज्ञ डॉ. पुष्कर अहिरे, सी.सी.सी.सेंटर चे नोडल अधिकारी डॉ.संदिप खैरणार, डॉ. स्वप्निल खैरणार, इन्चार्ज सिस्टर सुवर्णा कुमावत, विनया भालेकर, ब्रदर भरत देवरे, फार्मासिस्ट महेश सोनवणे, तुषार पाटिल, जिजा सोनवणे, एलिना जॉन मायकल या परिचारीकांसह संदिप काळुंखे, वॉर्डबॉय फुरखान पठाण, आरीफ, मो.साबिर,एजाज, ऊजेर यांच्यासह सफाई व इतर वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

जनसंपर्क अधिकारी
मालेगाव महानगरपालिका मालेगाव.

About Shivshakti Times

Check Also

कृषिरत्न फाउंडेशनतर्फे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते व साडीचोळी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते वाटप

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कृषिरत्न फाउंडेशनने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनाथ कुटुंबांना तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी …

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप मालेगाव – …

मालेगाव शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिस प्रशासनाच्या वतीने जाहीर आवाहन

विना मास्क फ़िरणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल 14 दिवस होम आयसोलेट व्यक्ती बाहेर फिरताना …

Leave a Reply

Your email address will not be published.