यंदा मानाचा वारकरी म्हणून वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान (शिवशक्ती टाइम्स न्युज )
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांची शासकीय महापूजा झाली.यंदा मानाचा वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. हा मान मला मिळेल असं स्वप्नातही वाटत नव्हतं. अशी पूजा करावी लागेल, असंही कधी वाटलं नव्हतं. मी माऊलीला साकडं घातलं आहे. आता आम्हाला चमत्कार दाखव, मानवानं हात टेकलेत. आपल्याकडे काही औषध नाही. असं तोंडाला पट्टी घालून कुठवर जगायचं. संपूर्ण आयुष्य अडकून गेलं आहे. आजपासून, या आषाढीपासून आम्हाला या कोरोनाच्या संकटातून बाहेर काढ. संपूर्ण जगाला पुन्हा आनंदी, मोकळं जीवन जगायला मिळू दे, असं साकडं घातलं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
जय हरी विठ्ठल!
