Breaking News

अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घेतली प्रवाशी रिक्षा चालक-मालक व पदाधिकारी यांची बैठक

मालेगाव शहरात कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रिक्षा चालक-मालकांना मा. अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव यांनी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे सॅनिटायझरच्या बॉटल्स व हायपोक्लोराइडचे केले वाटप

शिवशक्ती टाइम्स न्युज (संपादक -जयेश रंगनाथ सोनार दाभाडे )

मालेगाव-(उपसंपादक-आनंद दाभाडे ) 

केंद्र व राज्य शासनाने दिनांक २४/३/२०२० पासून कोविड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकडाऊन घोषीत केलेला आहॆ. त्यानुसार मा. जिल्हाधिकारी, नाशिक यांनी जिल्ह्यात प्रतिबंधकात्मक आदेश जारी केलेला आहॆ. लोकडाऊनची मुदत दिनांक ३१/७/२०२० पावेतो वाढलेली आहॆ. मालेगाव शहरात कोविड-१९ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पोलीस बंदबोस्त लावण्यात आलेला आहॆ. सध्या मालेगाव मध्य ५३ कंटेनमेंट झोन आहेत. दिनांक ३०/६/२०२० रोजी १६.०० ते १७.०० वाजे दरम्यान नियंत्रण कक्ष, मालेगाव येथील सुसंवाद हॉल समोर मालेगाव शहरात कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मा.श्री. संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव यांनी मालेगाव शहरात प्रवाशी रिक्षा चालक-मालक य रिक्षा युनियनचे पदाधिकारी यांची बैठक घेतली. बैठकीत मा.श्री. संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव यांनी रिक्षा मालक-चालक युनियन पदाधिकाऱ्यांना ऑटोरिक्षा मध्ये प्रवाशी वाहतूक करतांना स्वतः मास्क लावावे विना मास्क असलेल्या प्रवाशांना आपल्या रिक्षात बसवू नये. सामाजिक सुरक्षित अंतर पाळण्याकरीत आपल्या रिक्षात फक्त दोनच प्रवाशाची वाहतूक करावी. जे ऑटोरिक्षा चालक-मालक नियमाचे पालन करणार नाही त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन दंडात्मक व रिक्षा जप्तीची कारवाई करण्यात येईल. रिक्षा चालकांनी रिक्षा चालवितांना वारंवार सॅनिटायझरचा वापर करावा. प्रवाशांना रिक्षात बसवितांना प्रवाशांचे हातावर स्वतः सॅनिटायझर लावावे अशा सूचना दिल्या. रिक्षा चालक-मालकांना मा. अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव यांनी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे सॅनिटायझरच्या बॉटल्स व हायपोक्लोराइडचे वाटप केले. यापुढेही

शहर वाहतूक शाखा, मालेगाव तर्फे रिक्षात फवारणीकरिता सोडियम हायपोक्लोराइडचे वाटप करण्यात आले. बैठकीस श्री. बशीर शेख, पो.नि. शहर वाहतूक शाखा, मालेगाव आणि ६५ ते ७० रिक्षा चालक-मालक युनियनचे पदाधिकारी हजार होते.
सर्व रिक्षा चालक-मालकांनी कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोटार वाहन कायद्याचे पालन व लोकडाऊन प्रतिबंधक आदेशाचे पालन करावे असे आवाहन केले.

About Shivshakti Times

Check Also

कृषिरत्न फाउंडेशनतर्फे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते व साडीचोळी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते वाटप

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कृषिरत्न फाउंडेशनने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनाथ कुटुंबांना तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी …

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप मालेगाव – …

मालेगाव शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिस प्रशासनाच्या वतीने जाहीर आवाहन

विना मास्क फ़िरणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल 14 दिवस होम आयसोलेट व्यक्ती बाहेर फिरताना …

Leave a Reply

Your email address will not be published.