Breaking News

चाळीसगाव नगरपालिकेचे अनागोंदी कामकाज ; वाढत्या समस्याबाबत शहर विकास आघाडी आक्रमक

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन-रामचंद्र जाधव

चाळीसगाव  – शिवशक्ती टाइम्स न्यूज (आनंद दाभाडे )- चाळीसगाव नगगरपालिकेचे अनागोंदी कामकाज आणि शहरातील वाढत्या समस्यांबाबत लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेत समस्यांचा पाढा वाचला. यावेळी नगरसेवकांच्या वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शाम देशमुख, भगवान पाटील, रामचंद्र जाधव, दिपक पाटील, सुर्यकांत ठाकूर, शेखर देशमुख आदी उपस्थित होते.

कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले असून शहरातील व्यापाऱ्यांसह गोरगरीब जनतेला या प्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे यात रोजगार नसल्याने अनेकांची आर्थिक वाताहत झालेली आहे हे लक्षात घेता चाळीसगाव नगरपरिषदेच्या मालमत्ता करातून २५ टक्के सुट देण्यात यावी. तसेच नुकत्याच नगरपरिषद सदस्यास कोरोना विषाणूची भीती लक्षात घेता क्वारन्टाईन करण्यात आले आहे तसेच चाळीसगाव नगरपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी १० ते १२ सदस्य हे ५० ते ६० वयोगटातील आहेत. कोरोनाचा संभाव्य लक्षात घेता सुरक्षिततेबाबतच्या योजना नसून सर्वसाधारण सभेप्रसंगी सदस्यास संक्रमण लागण झाल्यास जबाबदार कोण असेल असे अनेकविध मागण्या यावेळी करण्यात आल्यात.

चाळीसगाव शहर वाढीव पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली असून योजनेच्या अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नाही. ठेकेदार मनमानी पध्दतीने काम करत असून सदर कामाची मोजमाप पुस्तिका देखील दैनंदिन नोंदवली जात नाही. शहर मल:निसारण योजनेबाबत नागरीकांच्या अनेक तक्रारी आहेत तर मल:निसारण योजनेला भुयारी गटारी नाव देवून दिशाभूल केली जात आहे. सदर योजनेचे सर्वसाधारण सभेत सादरीकरण न करता योजनेचा प्रस्ताव शासनास परस्पर प्रस्तावित करण्यात आला. सदर योजना चालू असतांना शासनाने नगरपरिषदेस अटी व शर्तींना अधीन राहून मान्यता दिली होती. जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी प्रस्तावित जागा एक महिन्याच्या आत शासकीय प्रक्रिया पुर्ण करुन देणे बंधनकारक होते परंतु आजमितीला जागा ताब्यात घेण्यात आलेली नाही.

शहरात कोरोना विषाणू संक्रमण लक्षात घेता शहरातील मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या नदीपात्राची स्वच्छता करण्यात येवून नालेसफाई करण्यात यावी जेणेकरुन आरोग्यास धोका निर्माण होणार नाही अशा अनेक तक्रारींचा पाढा यावेळी उपस्थित नगरसेवकांच्या वतीने वाचण्यात आला. नगरपरिषद कार्यालयीन कामकाजात त्रयस्थ व्यक्ती हस्तक्षेप करीत असल्याचे वृत्त दैनिकातून प्रसिद्धीस आले होते. नगरसेवक शेखर बजाज यांचे बंधु हिरानंद बजाज हे नगरपरिषदेच्या लेखाविभागाच्या गोपनीय दस्तावेजाची तपासणी करीत असतात. एखाद्या नगरसेवकाच्या भावाने अशा प्रकारचे बेजबाबदार व बेकायदेशीर कृत्य करणे चुकीचे आहे याची सखोल चौकशी करण्यासंदर्भात जिल्हाधिका-यांशी संवाद साधला.

सद्यस्थितीत शहरात सुरु असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे तीन तेरा वाजले असून पाईप, कॉंक्रीटीकरण, खडीकरण याबाबत निकृष्ट दर्जाचे काम झाले असून रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे याची देखील तपासणी होणे गरजेचे असल्याचे नगरसेवकांनी यावेळी सांगितले. सदर निवेदनावर सुरेश स्वार, सुरेश चौधरी, रामचंद्र जाधव, दिपक पाटील, सुर्यकांत ठाकूर, शेखर देशमुख, रवींद्र चौधरी, शंकर पोळ, मनिषा देशमुख, गीताबाई पाटील, अलका गवळी, रंजना सोनवणे, वंदना चौधरी, संगिता गवळी, योगिनी ब्राह्मणकर, सविता राजपूत आदी सदस्यांच्या स्वाक्षरी आहेत.

About Shivshakti Times

Check Also

माजी मंत्री आ . गिरीष महाजन यांच्या हस्ते जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे प्रथम कोवीड सेंटरचे उदघाटन .

सुप्रीम कंपनीच्या सीएसआर मधून ऑक्सिजन पाईपलाईन जामनेर— शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण   राज्यात …

चाळीसगाव तालुक्यासह गिरणा खोऱ्यात जलक्रांती पूर्ण होत असल्याचा आनंद — खासदार उन्मेश दादा पाटील (शिवशक्ती टाइम्स न्यूज)

५२६ कोटींचा वरखेडे लोंढे बँरेज महाकाय प्रकल्पाकरिता मदत करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री …

आत्मनिर्भर निधीतून आपल्या व्यवसायाला उभारी द्या — खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आवाहन

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या पुढाकारातून पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या जनजागृतीसाठी जिल्हा अभियानाचा शुभारंभ …

Leave a Reply

Your email address will not be published.