केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन
नाशिक दि. ०१ (प्रतिनिधी-युसूफ पठाण ):- एकही भुल कमल का फुल; पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या अशा घोषणा देत पेट्रोल/ डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फुल देऊन केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या दरवाढीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल, डिझेल दर कमी करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करावे व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी यावेळी बोलतांना केली.
नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ त्र्यंबक नाका येथील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. अच्छे दिनच्या घोषणेला भुलून निवडून दिलेल्या केंद्रातील भाजप सरकारने नियमितपणे केलेल्या दरवाढीबद्दल पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी “गुलाब पुष्प” देऊन गांधीगिरी आंदोलन केले.
पेट्रोल व डिझेलची मोठया प्रमाणात दरवाढ झाल्याने अजून महागाईचा भडका उडण्याची भीती देखील यावेळी व्यक्त करण्यात आली. मात्र केंद्रातील भाजप सरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांशी कुठलेही देणेघेणे नसल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर दरवाढीबद्दल आंदोलन करण्यात आले.
यावेळी एकही भुल कमल का फुल; पेट्रोल डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजे यासोबतच केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना वरील मागणीचे निवेदन देण्यात आले.
त्या काकू कुठे गेल्या ?
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकी पूर्वी टीव्हीवर येऊन “बोहत हो गयी मेहंगाई कि मार…” अस म्हणणाऱ्या त्या काकू आता पेट्रोलचे दर ९० रुपये व डिझेलचे दर ८० रुपये लिटर झाले तरी दिसत नाहीत त्यामुळे त्या काकू कुठे गेल्या ? असा सवालही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी यावेळी बोलतांना केला. पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या गांधीगिरी आंदोलना प्रसंगी जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार कदम, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, जिल्हा पदाधिकारी सर्वश्री विलास सानप, संदीप अहिरे, भुषण शिंदे, गणेश गायधनी, तौसीफ मणियार, प्रफुल्ल पवार, भारत पगार, निलेश गटकळ, साजिद शेख, राहुल गायधनी, विजय गांगुर्डे, हरिष उबराणी आदी मास्क घालून व सोशल डीस्टन्सिंगचे नियम पाळून सहभागी झाले होते.