Breaking News

मालेगाव छावणी पोलिसांची धडक कारवाई – चोरीच्या तब्बल ८ दुचाकी जप्त

मोटार सायकली चोर टिल्लू ला अटक – शिवशक्ती टाइम्स न्यूज

मालेगाव – संपादक – जयेश दाभाडे (सोनार): मालेगाव तालुक्यातील रावळगावातील टिल्लू गुरव उर्फ मनिष दत्तात्रय शिंदे (वय-४४) शहरात ६० फुटी रस्त्यावर चोरी केलेल्या मोटरसायकली विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती शनिवारी दि. २७ रोजी छावणी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार वाडिले यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार वाडिले यांनी आपले वरिष्ठ नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. रविराज गवंडी, पो.शी. नितीन बारहाते, महेंद्र पवार, वासुदेव नेरपागार, संजय पाटील, संदीप राठोड, यांनी ६० फुटी रोड येथे सापळा रचून आरोपी टिल्लू यास होंडा शाईन दुचाकी सह पकडण्यात आले. त्याला मालेगाव शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून ८ मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल केले असून त्याच्याकडून ८ दुचाकी जप्त केल्या आहेत. या टिल्लू गुरव यावर जायखेडा येथे गुन्हे दाखल आहेत.

About Shivshakti Times

Check Also

मालेगावी १० तलवारींसह चौघे ताब्यात

शहर पोलिस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी शहरातील रमजानपुरा …

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *