Breaking News

श्री. संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव यांनी घेतली मालेगाव शहरातील कुलजमात तंजीमचे मौलानांची बैठक

मालेगाव : (उपसंपादक -आनंद दाभाडे ) जगात व देशात आणि राज्यात कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने दिनांक २२/०३/२०२० पासून लॉकडाऊन घोषित केलेले आहे. लॉकडाऊन अंमलबजावणी करण्याकरिता व कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीत मा. जिल्हाधिकारी, नाशिक यांनी दिनांक २४/०३/२०२० पासून नाशिक जिल्ह्यात भारतीय दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वय प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेले आहे. प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी सुरु आहे.
केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी लॉकडाऊन आदेशात मुदतवाढ केलेली आहे. लॉकडाऊनची मुदत दिनांक ३१/०७/२०२० पावेतो वाढलेली आहे. लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरितामा.श्री. संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव यांनी मालेगाव शहरातील कुलजमात तंजीमचे मौलानांची बैठक घेतली.
बैठकीत मा.श्री. संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव यांनी मालेगाव शहाराच्या कुलजमात तंजीमच्या मौलानांना आवाहन करतांना मालेगाव शहरात अद्यापावेतो कोविड-१९ चा प्रादुर्भाव संपलेला नाही. अजूनही शहरात कोविड-१९ चे रुग्ण सापडत आहेत. त्याकरिता आपण मालेगावच्या जनतेला आपल्या माध्यमातून मास्क वापरावे, सामाजिक सुरक्षित अंतर पाळण्यासाठी सांगावे. कोविड-१९ ची जेष्ठांना लवकर बाधा होते म्हणून शहरातील जेष्ठांना काळजी घेण्यासाठी सांगावे. पावसाळ्याचे दिवस आहेत साथीचे आजार वाढू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेण्यास सांगावे. घरीच गरम जेवण, गरम चहा, गरम पाणी घ्यावे तसेच थंड पेय व पदार्थ खाण्या-पिण्यास टाळण्यास सांगावे. आगामी बकरी ईद लॉकडाऊनचे पालन करून साजरी करण्यास सांगावे.
लॉकडाऊनमध्ये बाजारपेठ उघडून व्यवहार सुरु आहे. कोविड-१९ या आजारावर भारतीय वैज्ञानिकांनी लस शोधली आहे. लवकरच प्रशासकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर लस बाजारात येईल तोपर्यंत काळजी घेण्यासाठी सांगावे. पोलिसांनी रिक्षा चालक-मालकांना सॅनिटायझर आणि सोडिअम हापोक्लोराइड वाटप केले. शहरातील लोकांना मास्क वापर करावा. बाहेरगावातून येणाऱ्या लोकांची माहिती पोलिसांना व मनपाला द्यावी.
आतापावेतो मालेगावच्या जनतेने लोकडाऊन संबंधी जसे सहकार्य केले तसेच यापुढेही करण्याचे आवाहन केले. यावेळी मंगेश चव्हाण  SDPO कॅम्प , नितीन कापडणीस उपयुक्त मनपा, सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी, मालेगाव शहर व कॅम्प पोलीस स्टेशन तसेच मा. मौलाना मुफ्ती इस्माईल कास्मी, आमदार मालेगाव मध्य, कुलजमात तंजीमचे सर्व मौलाना हजर होते.

About Shivshakti Times

Check Also

कृषिरत्न फाउंडेशनतर्फे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते व साडीचोळी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते वाटप

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कृषिरत्न फाउंडेशनने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनाथ कुटुंबांना तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी …

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप मालेगाव – …

मालेगाव शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिस प्रशासनाच्या वतीने जाहीर आवाहन

विना मास्क फ़िरणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल 14 दिवस होम आयसोलेट व्यक्ती बाहेर फिरताना …

Leave a Reply

Your email address will not be published.