Breaking News

चाळीसगाव शहरातील तितुर नदीवरील पुलाचे काँक्रीट पहिल्याच पुरात गेले वाहून……

#चाळीसगाव :- (प्रतिनिधी-शिवशक्ती टाइम्स न्यूज) : चाळीसगाव शहरातील सुवर्णाताई नगर ते शास्त्री नगरला जोडणारा तितुर नदीवरील पूल गेल्या काही महिन्यापूर्वी तयार झाला होता काल रात्री (दि.02/07/2020) रोजी झालेल्या पावसामुळे तितुर नदीला पाणी आले.पहिल्याच पाण्यात पुलावरचा काही काँक्रीटचा भाग वाहून गेला. छायाचित्रात दिसत असलेला काँक्रीटचा सिमेंटचा थर हा वाहून गेला आहे तर खाली फक्त मुरूम शिल्लक आहे.
अशा निकृष्ट दरजेचे काम करून ठेकेदार जर फक्त आपला खिसाच गरम करत असतील तर लोकांच्या जीवच काय? अशा प्रश्न सर्वसामान्य जनतेस पडला आहे.
जर पहिल्याच पाण्यात अशी अवस्था आहे जर जोरदार पाऊस आला तर पूर्ण पूलच वाहून जाईल अशी भीती परिसरात व्यक्त करत आहे आणि त्याचप्रमाणे या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

About Shivshakti Times

Check Also

चाळीसगाव तालुक्यासह गिरणा खोऱ्यात जलक्रांती पूर्ण होत असल्याचा आनंद — खासदार उन्मेश दादा पाटील (शिवशक्ती टाइम्स न्यूज)

५२६ कोटींचा वरखेडे लोंढे बँरेज महाकाय प्रकल्पाकरिता मदत करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री …

आत्मनिर्भर निधीतून आपल्या व्यवसायाला उभारी द्या — खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आवाहन

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या पुढाकारातून पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या जनजागृतीसाठी जिल्हा अभियानाचा शुभारंभ …

चाळीसगाव वृक्षांचा ‘वाढदिवस’ साजरा करत समाजापुढे “झाडे लावा,झाडे जगवा” चा संदेश ; युनिटी क्लब व शिवाजी नगर मित्र मंडळाचा उपक्रम

शिवशक्ती टाइम्स न्यूज चाळीसगाव (शिवशक्ती टाइम्स न्यूज – अमोल इंगळे )- ‘निर्धार हरितक्रांतीचा, वसा वृक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published.