येवला- मंठा, जिल्हा जालना येथे पीडित नवविवाहिता वैष्णवीताई गोरे (माळी) यांच्यावर एकतर्फी प्रेमप्रकरणातून झालेल्या अमानुष हत्या प्रकरणी अल्ताप शेख नावाच्या गुंड प्रवृत्तीच्या विरोधात कठोर व कायदेशीर कारवाई व्हावी तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करून पीडित वैष्णवी ताईस न्याय मिळावा यासाठी मा..तहसीलदार साहेब येवला यांना महात्मा फुले बिग्रेड येवला यांच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळे येवला तालुका अध्यक्ष श्री. योगेश खैरनार, उपाध्यक्ष श्री. गोकुळ आहेर, सचिव श्री. रामदास भुजबळ, तसेच महात्मा फुले ब्रिगेड येवल्याचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
