Breaking News

‘कृषी संजीवनी सप्ताहाच्या’ माध्यमातून बळीराजाच्या सक्षमीकरणास होणार मदत : कृषी सचिव एकनाथ डवले

मालेगाव, दि. 03 (उमाका वृत्तसेवा) : उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ अशी त्रीसुत्री घेवून, शेतकऱ्याच्या बांधावर जावून, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा उपक्रम कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. कृषी संजीवनी सप्ताहात अशा उपक्रमांच्या माध्यमातून बळीराजाच्या सक्षमीकरणास नक्कीच मदत होईल असा विश्वास कृषी सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील टेहरे शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी अशोक पवार, डाळींब संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ.सचिन हिरे, कृषी विज्ञान केंद्र प्रमुख अमित पाटील, किटक शास्त्र विभागाचे विशाल चौधरी, कृषी अधिकारी भास्कर जाधव, मंडळ कृषी अधिकारी अशोक गिरगुणे, गणपत शिंदे, रमेश पवार, पुनम दामोदर, शैलेंद्र वाघ यांच्यासह कृषी विभागाचे कर्मचारी व समूह पद्धतीने कृषी विस्तार कार्यक्रमासाठी निवड करण्यात आलेले शेतकरी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना श्री.डवले म्हणाले, टेहरे शिवारातील शेतकऱ्यांनी समुह पध्दतीने मका पिकाचे उत्पादन खर्च कमी करून अधिकाधिक उत्पन्न कसे वाढविता येईल याचे सुयोग्य नियोजन केले आहे. शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणे गरजेचे असून त्यासाठी शेतकऱ्याला अद्ययावत कृषी तंत्रज्ञान मिळणे आवश्यक आहे. अद्ययावत कृषी तंत्रज्ञान ‘कृषी संजीवनी सप्ताह’च्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा, अशा सुचना त्यांनी कृषी विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच डाळींब बागेची पहाणी करतांना त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. डाळींब आणि द्राक्षे पिकांबद्दल शेतकऱ्यांची मते जाणून घेतली. फळ पिक विमा योजनेबद्दल माहिती देत, कांदापिकासाठी ठिबक सिंचनाचे महत्व आणि उत्पादन कसे वाढविता येईल याबद्दल शेतकऱ्यांशी चर्चा केली. उपस्थित शेतकऱ्यांनी देखील नाफेड मार्फत शासकीय खरेदीसाठी प्राधान्य देण्याबाबत मागणी केली.

कृषी मंत्री दादाजी भुसे राज्य यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या समुह आधारित कृषी विस्तार कार्यक्रमातंर्गत उपक्रमांची माहिती देतांना उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे म्हणाले, एक गाव एक वाण या संकल्पनेतून एकाच वेळी बिज प्रक्रिया, बियाणे, रासायनिक खते ,सूक्ष्म मुलद्रव्ये व इतर लागणाऱ्या निवीष्ठा थेट विक्रेत्यांकडून समुहपध्दतीने खरेदी यामुळे टेहरे शिवारातील शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. मका पिकाबद्दल घेण्यात आलेल्या तांत्रिक कार्यशाळा व लष्करी अळी नियंत्रणासाठी सामुहिकरित्या जैविक उपाय म्हणून मास ट्रॅपिंगसाठी 3000 कामगंध सापळ्याचे वाटप, तसेच मका पिकांवरील एकात्मिक किडव्यवस्थापन अंतर्गत रासायनिक उपाय व निंबोळी अर्कचे महत्वही शेतकऱ्यांना पटवून त्याची प्रभावी अंमलबजावणी शेतकरी करित असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत मालेगाव उपविभागात शेतकऱ्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण, शेतीशाळा, कृषी विभागाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धी, शेतकऱ्यांच्या यशोगाथा तयार करणे, सेंद्रिय शेतीमधील विविध बाबींची प्रात्यक्षिके घेणे, निंबोळी गोळा करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे श्री देवरे यांनी सांगितले. समूह पद्धतीने कृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत टेहरे, नांदगाव, चिंचावड इत्यादी गावात घेतलेल्या उपक्रमाची माहिती मंडळ कृषी अधिकारी अशोक गिरगुणे यांनी याप्रसंगी दिली.

खते व निवीष्ठांची कृत्रीम टंचाई करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

खरीपाच्या संदर्भात पेरणीचे पूर्ण नियोजन झाले असून त्यानुसार कामकाज झाले आहे. त्याबरोबर खते व निवीष्ठांची कुठेही टंचाई भासणार नाही. काही शेतकऱ्यांच्या खतांबाबत काही अडचणी होत्या, त्यासंदर्भात संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. खते व निवीष्ठांची साठेबाजी करून कृत्रीम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही सचिव श्री.डवले यांनी यावेळी दिले. तालुक्यातील सायने व पाडळदे येथील शेतकऱ्यांच्या बांधावर आदित्य कृषी एजन्सीजचे दिपक मालपुरे यांच्या माध्यमातून आरसीएफ कंपनीच्या खतांच्या 370 बॅगांचे 60 शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.

About Shivshakti Times

Check Also

कृषिरत्न फाउंडेशनतर्फे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते व साडीचोळी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते वाटप

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कृषिरत्न फाउंडेशनने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनाथ कुटुंबांना तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी …

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप मालेगाव – …

मालेगाव शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिस प्रशासनाच्या वतीने जाहीर आवाहन

विना मास्क फ़िरणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल 14 दिवस होम आयसोलेट व्यक्ती बाहेर फिरताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *