Breaking News

चाळीसगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अस्वच्छता……अधिकारी, कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात

चाळीसगाव – शिवशक्ती टाइम्स न्यूज (चाळीसगाव प्रतिनिधी – अमोल इंगळे)  शहरातील सुभाष लॉज समोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात चक्क भिंतींवर गुटखा खाऊन थुंकल्याचे प्रकार होत असून यामुळे तेथील अधिकारी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात एका खोलीत जवळपास 5 शाखा अभियंता बसतात आणि त्याठिकाणी दिवसभर बाहेरील लोक व ठेकेदारांची ये जा असते यातील बरेच जण हे तंबाखू, गुटखा खाणारे असून ते चक्क बसल्या जागी भिंतीवर थुंकत असतात तर काही जण अधिकारी यांच्या खुर्चीवर बसून रुबाब करीत असल्याचा प्रकार देखील होत असल्याचे बोलले जात आहे खरे पाहता शासकीय कार्यालयात धूम्रपान बंदी असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात या नियमांचे उल्लंघन होत असल्याने तेथील अधिकारी कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे वरीष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन हा प्रकार थांबवावा अशी चर्चा अधिकारी वर्गात आहे.

About Shivshakti Times

Check Also

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! याच महिन्यात सुरू होतेय बहुप्रतिक्षित सेवा,

प्रवासात अजिबात नाही येणार कंटाळा……. शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेली …

सैन्य भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक ; परीक्षा रद्द……

सैन्य भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक ; ⭕ परीक्षा रद्द…… शिवशक्ती टाइम्स न्यूज’ प्रतिनिधी …

सर्वसामान्यांना पुन्हा झटका,…घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या……

सर्वसामान्यांना पुन्हा झटका, ⭕चार दिवसांत दुसऱ्यांदा घरगुती गॅसच्या किंमती २५ रुपयांनी वाढल्या…… शिवशक्ती टाइम्स न्यूज’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *