महाकाल मंदिर बाहेर विकास दुबे ने केले सरेंडर
आज सकाळीच विकास दुबेचे दोन साथीदार यांचे एन्काऊंटर
उज्जैन- शिवशक्ती टाइम्स न्यूज ब्युरो चिफ – कानपूरमध्ये 3 जुलै रोजी आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येचा आरोप असलेला मुख्य आरोपी विकास दुबे याला मध्य प्रदेशातील उज्जैनमधून अटक करण्यात आली आहे.
माहितीनुसार गँगस्टर विकास दुबेला अत्यंत नाट्यमय पद्धतीने अटक झाली. आधी त्याने उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात दोन सहकाऱ्यांसोबत देवाचे दर्शन घेतले. विकास दुबे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात जात असताना सुरक्षा कर्मचाऱ्याने त्याला ओळखले. त्यानंतर तातडीने पोलिसांना कळवण्यात आले.
उज्जैनच्या महाकाल मंदिरातून तो सरेंडर करणार असल्याचीहि माहिती होती, मात्र त्याआधीच पोलिसांनी अटक केली. या अटकेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. इंदौर चे डीआईजी साहेबांच्या सांगण्यानुसार अटक करताना ओरडून सांगत होता कि *मैं विकास दुबे हूं, कानपुर वाला, पुलिस ने मुझे पकड़ लिया है.* जवळपास 10 राज्यातील पोलिस विकास दुबेला शोधत होते.
विकास दुबे च्या दोन साथीदारांचा आज सकाळी एन्काऊंटर केला होता यात प्रभात मिश्रा आणि बउअन यांना मारले होते. प्रभातला कानपूरच्या पनकी ठाणा क्षेत्रात झालेल्या चकमकीत मारले गेले. त्याला अटक करुन फरिदाबादवरुन रिमांडसाठी आणले जात असताना त्याने पोलिसांचे हत्यार हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा खात्मा केला. यावेळी त्याने पोलिसांवर फायरिंग देखील केली, त्यात दोन पोलिस जखमी झाले आहेत.
याबाबत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक ट्विट केलं आहे.
जिनको लगता है की महाकाल की शरण में जाने से उनके पाप धूल जाएँगे उन्होंने महाकाल को जाना ही नहीं।
हमारी सरकार किसी भी अपराधी को बख्श्ने वाली नहीं है…
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) July 9, 2020