Breaking News

कोरोनाशुन्य नाशिक जिल्हा होईपर्यंत शासन-प्रशासन प्रयत्नांची शिकस्त करत राहणार : पालकमंत्री छगन भुजबळ

शिवशक्ती टाइम्स न्यूज – शासकीय लॅबसह प्लाझ्मा संकलनही तात्काळ सुरू करावे: पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक – ( प्रतिनिधी – युसूफ पठाण ) कोरोना संसर्गाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या तुलनेत नाशिकमध्ये मृत्युदर कमी असून त्यात आपण १२ व्या क्रमांकावर असून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये ५ व्या, तर रूग्णसंख्येच्या बाबतीत ७ व्या क्रमांकावर आहोत; परंतु हा आकडा शून्यावर येईपर्यंत शासन -प्रशासनाच्या स्तरावर प्रयत्नांची शिकस्त करत राहू तसेच शासकीय लॅबसह नाशिक शहरात प्लाझ्मा संकलनाचे काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

आज कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री श्री.भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कोरोना नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, कोरोना संसर्गितांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे आज नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसतेय. परंतु या माध्यमातुन आपण वेळीच संसर्गितांपर्यंत पोहचून त्याला गृह अथवा संस्थात्मक विलगीकरणात ठेवून त्यापासून होणाऱ्या संभाव्य संसर्गाला आपण नियंत्रणात आणतो आहोत. वाढती रूग्णसंख्या ही आपल्या चोख कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्यवस्थापनाचे यश असून आजच्या स्थितीत राज्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्येही आपण राज्यातील इतर शहर व जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत वेगाने काम करत आहोत.

जिल्हा रुग्णालयात सरकारी लॅबच्या निर्मितीचे जे काम सुरू झाले होते ते अंतीम टप्प्यात असून येत्या १५ दिवसाच्या आत लॅब सुरू कशी होईल याकडे जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या प्रशासनाने लक्ष केंद्रीत करावे तसेच शहरातील काही लॅबरोटरीजला परवाने देवून त्यांच्या माध्यमातून कोरोना उपचारासाठी भविष्यात प्लाझ्मा संकलनाचेही काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या.

नाशिक शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणावर रूग्णसंख्या वाढली आहे. अशा भागात कंटेंटमेंट झोनची अंमलबजावणी अत्यंत कडक करण्यात यावी, हे करत असताना केल्या जाणाऱ्या कारवाईला मानवी चेहरा असावा त्याचबरोबर शहरात ज्या ठिकाणी निर्बंध नाहीत त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे, अशा ठिकाणी पोलिसांनी गर्दी होणार नाही त्यासाठीचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. वेळोवेळी अशा ठिकाणी पोलिसांनी गस्त ठेवून नागरीकांना व दुकानदारांना गर्दी होणार नाही त्यासाठी सूचना द्याव्यात. सायंकाळी ७ वाजेनंतर संचारबंदीचे काटेकोर पालन करण्यात यावे; ५ वाजता स्वयंस्फुर्तीने दुकाने बंद करून ७ वाजेच्या आत सर्व व्यवहार व संचार अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळता बंद करणे,सोशल डिस्टन्सी सोबतच मास्क न वारणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना यावेळी पोलीस प्रशासनास पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या.

येणाऱ्या काळात लागणारी बेड ची गरज लक्षात घेवून मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात ३५०, एसएमबीटी कॉलेज येथे १०० बेड उपलब्ध होवू शकतात त्याबातचे नियोजन तात्काळ करण्यात यावे, त्यासाठी लागणारा मनुष्यबळ, वैद्यकीय साधने, औषधोपचार, रूग्णांचा आहार,तत्सम सुविधांसाठी लागणारा खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे. नाशिक महानगरालिकेच्या कोविड सेंटरमध्ये लागणाऱ्या अतिरिक्त मनुष्यबळासाठी तात्काळ भरती करण्यात यावी. तसेच आयएमए च्या तज्ज्ञ डॉक्टरांचीही त्यासाठी सेवा व मदत घेण्यात यावी. खाजगी रुग्णालयातून उपचार घेणाऱ्या रूग्णांच्या अडचणी सोडविण्यासाठी समन्वयक डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात याव्यात. शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे रूग्ण हे सर्वसामान्य गरीब जनता असून शासनाकडून येणाऱ्या नवीन औषधांचा वापर शासकीय रूग्णालयांसाठी प्राधान्याने करण्यात यावा, महापालिकेच्या बिटको रुग्णालयात ४०० बेडची व्यवस्था करण्यात यावी, अन्य महापालिका ज्याप्रमाणे याबाबत काम करीत आहे तसेच नाशिक महापालिकेनेही करावे अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिली.

मालेगाव तसेच शहरातील व जिल्ह्यातील ज्या ज्या भागातील रूग्णालयांमधून कोरोना संसर्गित बरे झाले आहेत, अशा भागातील, रुग्णालयातील अनुभवी डॉक्टरांचा ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व टेलीमेडिसिनसारख्या माध्यमांचा वापर करून रूगणांच्या उपचारात मोठ्या प्रमाणात वापर करून घ्यावा. कोमॉर्बिड रूग्णांबात अतिदक्षता घेण्यात यावी. कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना मृत्यु शुन्यावर कसे येतील यासाठी भविष्यात सर्वांनी नियोजन करावे त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, शासन प्रयत्नशील असून आपणही त्यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीत झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सहभाग घेवून आपापल्या कार्यक्षेत्रातील माहिती सादर करून केलेल्या उपाययोजना व भविष्यातील नियोजनाची दिशा स्पष्ट केली.

About Shivshakti Times

Check Also

सटाणा उपनगराध्यक्ष पदी श्री दीपक केदा पाकळे यांची बिनविरोध निवड

सटाणा उपनगराध्यक्ष पदी श्री दीपक केदा पाकळे यांची बिनविरोध निवड शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – …

खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रावसाहेब दानवेंचे जावई अडचणीत; पोलिसांनी दाखल केला गुन्हा……..

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण भा.ज.पा.चे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे …

महाराष्ट्र पोलीस पाटील असोसिएशन चे राज्य उपाध्यक्ष कैलास बच्छाव यांना मातृशोक

दुःखद निधन मालेगाव – कै. हि रू बाई राजाराम बच्छाव यांचे वय वर्षे 85 दिनांक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *