शिवशक्ती टाइम्स न्यूज
लासलगांव- (प्रतिनिधी – युसूफ पठाण ) भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञात माथेफिरूने हल्ला करून तोडफोड केली असून बाबासाहेबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या वास्तूची विटंबना केल्याच्या निषेधार्थ लासलगांव पोलीस स्टेशनचे मा.पोलीस निरीक्षक खंडेरावजी रंजवेसाहेब यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी लासलगांव व ब्ल्यू टायगर ग्रुप राजवाडा लासलगांवच्या वतीने करण्यात आली.
या प्रसंगी भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी लासलगांव शहर अध्यक्ष मा. सोनूभाऊ शेजवळ, ब्ल्यू टायगर ग्रुप राजवाडा लासलगांव संस्थापक अध्यक्ष मा. सागर भाऊ आहिरे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष मा.इरफान मनीयार, राष्ट्रवादी काँग्रेस युवा आघाडी अध्यक्ष मा.अरशद शेख, ब्ल्यू टायगर ग्रुप लासलगांव शहर अध्यक्ष मा. राहुल भाऊ पवार
अमोल संसारे सर, अनिल मुथा, राहुल शेजवळ, रवी विस्ते, निवृत्ती विस्ते, विपुल शेजवळ, विकास खंडिझोड हे उपस्थिती होते.
यांनी सरकारने केलेल्या शांततेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स पाळत निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध नोंदवला आहे.
सदर घटनेमुळे महाराष्ट्रातील बहुजन जनतेच्या भावना दुखावल्या असून जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही घटक करत आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला अशा घटनांमुळे काळिमा लागला जातो. त्यामुळे सदर घटनेचा आम्ही निषेध करत आहेत असे भारिप बहुजन महासंघ व ब्ल्यू टायगर ग्रुप राजवाडा लासलगांव यांच्या निवेदनात म्हटले आहे.