शिवशक्ती टाइम्स न्यूज –
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रदेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांना व इतर कुटुंबियांना संरक्षण द्या
~~ महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे
नाशिक (उपसंपादक – आनंद दाभाडे ) – शनिवार दिनांक 11 जुलै 2020 रोजी उपनगर शहर पोलीस स्टेशन येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या वतीने निषेध निदर्शने करण्यात आले..!
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व RPI आ चे राष्ट्रीय अध्यक्ष मा नामदार श्री रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशाने व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली उपनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा सुनीलजी रोहकले साहेब यांस संबंधित निवेदन सादर करून सरकारला पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली…
निवेदनात….
1)परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच निवासस्थान असलेल्या महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या राजगृहावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी CBI मार्फत चौकशी करून संबंधितावर कडक कार्यवाई करावी..!
2)विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रदेय ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व इतर कुटूंबियांना संरक्षण देण्यात यावे..!
3)अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 चे सुधारणा अधिनियम 2016 च्या नियम 3 नुसार सरकारला खबरदारीची आणि प्रतिबंधक उपाय योजना करण्याचा अधिकार असल्याने या नियमाअंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारी घ्यावी.. आणि नियम 8 द्वारे राज्यभर अनुसूचित जाती जमाती संरक्षण सेल स्थापन करून जनतेला या बाबदची माहिती द्यावी..
इतर मागण्या नमूद करण्यात आल्या असून..सदर निदर्शनास…प्रमुख उपस्थित रिपाई(आ) चे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे उ महाराष्ट्र युवक कार्याध्यक्ष मंगेशजी शिंदे नाशिक जिल्हा युवक कार्याध्यक्ष विकीभाई साळवे नाशिक शहर उपाध्यक्ष नितीनभाऊ ठोके महाराज ग्रुप चे अध्यक्ष कुणालभाई साळवे युवा नेते विक्रांतभाईजी गांगुर्डे सनी जाधव रोहित वावळे आदी उपस्थित होते…
सदर निवेदन हे कायदा सुव्यवस्था व सोशल डिस्टन्स पाळून करण्यात आले..!