मालेगाव- शिवशक्ती टाइम्स न्यूज – महाराष्ट्र माऊली साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाने अनेक पिढ्या संस्कारित केल्या आहेत. या पुस्तकातील चित्राचा वापर करून अत्यन्त घाण असे मिम्स बनवून काही समाजकंटक ते सोशल मीडियावर फिरवत आहेत. हा साने गुरुजी आणि त्याची आई या दोन्ही चरित्रांचा अपमान आहे. उभ्या महाराष्ट्राचा अपमान आहे.
उभ्या महाराष्ट्राला आदर्श असे संस्कार देणारी श्यामची आई आणि स्वातंत्र्य सैनिक महाराष्ट्र माऊली साने गुरुजी यांचे बद्दल असे घाण मिम्स बनवून फिरवणाऱ्या समाजकंटकाना शोधून त्यांचे वर कडक कारवाई करून शिक्षा द्यावी. असे निवेदन राष्ट्र सेवा दल कार्यकर्त्यानी मा.अपर जिल्हाधिकारी साहेब यांना दिले.
या प्रसंगी राज्य सचिव नचिकेत कोळपकर, सेवा दल मंडळ सदस्य स्वाती वाणी,जिल्हा संघटक रविराज सोनार, तालुका संघटक सुधीर साळुंके, कोषाध्यक्ष राजेंद्र दिघे, जयेश शेलार, राजीव वडगे ,हरीश पाठक, अनवर पठाण, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
