Breaking News

माथाडी व सुरक्षा रक्षक कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करुन त्यांना कोव्हिड-१९ संबंधित विमा कवच संरक्षण देण्याचा निर्णय – शिवशक्ती टाइम्स न्यूज

मुंबई,दि.२८:-  शिवशक्ती टाइम्स न्यूज ब्युरो चिफ  –  माथाडी व सुरक्षा रक्षक कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करुन त्यांना कोव्हिड-१९ संबंधित विमा कवच संरक्षण देण्याचा निर्णय आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री ना.अजितदादा पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकित घेतला.

नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची चढ-उताराची कामे करणा-या माथाडी कामगार व सुरक्षा देणा-या सुरक्षा रक्षक कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करुन त्यांना कोव्हिड-१९ संबंधित विमा कवच संरक्षण देण्यासंबंधी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्यासमोर मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकिस कामगार मंत्री मा. दिलीप वळसे पाटील तसेच वित्त,कामगार,गृह विभागाचे अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते नामदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे,सुरक्षा रक्षक युनियनचे अजिंक्य भोसले आदी उपस्थित होते. माथाडी व सुरक्षा कामगार हा कष्टाची कामे करणारा घटक असून,ल्याला शासन व मा.अजितदादा पवार यांनी न्याय दिल्याबद्दल माथाडी कामगार नेते नामदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांनी तमाम माथाडी व सुरक्षा रक्षक कामगारांच्यावतिने आभार व्यक्त केले आहेत.

कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने दि.२२ मार्च, २०२० पासून संपुर्ण ठिकाणी लॉकडाऊन जाहिर केला होता. राज्य शासनाच्या आवाहनानुसार नव्यामुंबईतील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे अन्न-धान्य मार्केट, मसाला मार्केट,कांदा-बटाटा मार्केट,भाजीपाला व फळे मार्केट आवार तसेच नाशिक,नगर पुणे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील इतर कृषि उत्पन्न बाजार समितीत्या चालू ठेवण्यात आल्या होत्या व या आवारात जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची तसेच गॅस सिलेंडर कंपन्या,खत कारखाने,रेल्वे माल धक्क्यावर येणारा अन्न थान्य,डाळी,खते या मालाची चढ-उताराची कामे विविध माथाडी बोर्डात नोंदीत असलेले माथाडी,वारणार, मापाडी,पालावला महिला कामगार करीत आहेत. तसेच सुरक्षा देण्याचे काम सुरक्षा रक्षक कामगार करीत आहेत.

लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी जीव धोक्यात घालून बाजार आवार व कंपन्या,रेल्वे माल धक्क्यावर मालाची लोडींग, अनलोडींगची कामें करीत असताना कोरोना या महाभाकर संसर्गजन्य रोगाची लागण होऊन अनेक माथाडी कामगार तसेच सुरक्षा देणा-या सुरक्षा रक्षक कामगारांचा आणि अनेक व्यापा-यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन कालावधीत कोरोना या विषाणूची बाधा होऊन माथाडी, सुरक्षा रक्षक कामगार व अन्य घटकाचा दुर्दवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य होण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या कोव्हिड-१९ संबंधित डॉक्टर्स,नर्सेस ,पोलीस, पालिका कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून विमा कवच संरक्षण/भरपाई देण्याची तरतुद करण्यात आली आहे,त्याप्रमाणे माथाडी, सुरक्षा रक्षक कामगार व अन्य घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करुन त्यांना कोव्हिड-१९ संबंधित विमा कवच संरक्षण/भरपाई मिळावी,कोरोनाची बाधा झाल्यास त्याला औषधोपचारावर खर्च करण्यासाठी मेडिक्लेम विमा उतरावा कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून आवश्यकत्या सुविधा उदा:-मास्क सॅनिटायझर इत्यादी सुविधा उपलब्ध करुन द्यावी, माथाडी कामगार, सुरक्षा रक्षक कामगार व अन्य घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करुन त्यांना रेल्वेने प्रवास करण्यास QR Code E-Pass पास देण्याची व्यवस्था व्हावी या व अन्य मागण्यां महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने शासनाकडे सादर केल्या होत्या.

शासनाच्या कामगार विभागाने विविध माथाडी मंडळांना दि.२२ जुलै,२०२० च्या आदेशाव्दारे माथाडी कामगारांना मंडळाकडे जमा असलेल्या राखीव निधीतून रु.५,०००/- आर्थिक साहाय्य करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. माथाडी व सुरक्षा रक्षक कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करुन त्यांना कोव्हिड-१९ संबंधित विमा कवच संरक्षण देण्याचा तसेच रेल्वेने प्रवास करण्यासाठी QR Code E-Pass पास देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व बाज़ार समित्या,नाशिकरोड मालधक्के शासकीय गोडाउन इतर आस्थापना मधील माथाडी कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

About Shivshakti Times

Check Also

जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिका गुड्ड तिवारीचा खून,

कमाल चौकात दिवसाढवळ्या थरार…… नागपूर : जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. …

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक……..

दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण …

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची विधानभवनात गृहमंत्र्यांसोबत बैठक संपन्न

पोलिस पाटीलांचे मानधन वाढीसह अनेक प्रश्न मार्गी लागणार शिवशक्ती टाइम्स न्यूज महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published.