शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण पिंपळगाव बाजार समिती सभागृहात आज माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निफाड तालुक्यातील सर्वपक्षीय जेष्ठ नेत्यांची बैठक झाली. यावेळी दोन्ही कारखाने सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. माजी आमदार अनिल कदम यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली. निसाका-रासाकाच्या मुद्द्यावर शेतकरी हितासाठी आपण आमदार दिलीप बनकर यांना राजकीय जोडे बाजूला ठेवून सहकार्य करणार असून बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे अनिल कदम यांनी यावेळी जाहीर केले. निसाकाच्याबाबत जिल्हा बँकेच्या बैठकीत चर्चा झाली असून इतर सक्षम संस्थाना कारखाने चालवण्यास देण्यासाठी अध्यादेश काढून विधानसभेत कायदा पारीत होण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे आमदार दिलीप बनकर यांनी यावेळी सांगितले. जेष्ठ नेते बाळासाहेब वाघ व विनायकदादा पाटील यांनी आजी-माजी आमदारांनी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येऊन आगामी हंगामात कारखाने कार्यान्वित करावे, असा सल्ला दिला. त्यासाठी उपस्थित सर्वांनी त्यासाठी अनुकूलता दर्शविली. बैठकीच्या चर्चेत मविप्र सरचिटणीस नीलिमाताई पवार, जिप अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माणिकराव बोरस्ते, नानासाहेब बोरस्ते, राजेंद्र मोगल, अनिल पाटील कुंदे, विश्वास कराड, रामभाऊ मालोदे, खंडू बोडके-पाटील, बाजार समिती सचिव बाजारे, प्रमोद कुटे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार दिलीप बनकर यांचा विनायकदादा पाटील व अनिल कदम यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.!
