Breaking News

चाळीसगाव तालुक्यासह गिरणा खोऱ्यात जलक्रांती पूर्ण होत असल्याचा आनंद — खासदार उन्मेश दादा पाटील (शिवशक्ती टाइम्स न्यूज)

५२६ कोटींचा वरखेडे लोंढे बँरेज महाकाय प्रकल्पाकरिता मदत करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरिशभाऊ महाजन यांचे मानले जाहीर आभार.

खासदार उन्मेश दादा यांचा धरण साईट वरील हृदय संवाद हजारो शेतकरी,नागरिकांनी अनुभवला
गिरणा परिसरातील सोशल मीडियावर खासदारांचे जोरदार अभिनंदन : 
अनेक अडथळे पार करून वरखेडे लोंढे बँरेज प्रकल्प पूर्ण : 
बँरेज पाहत शेतकऱ्यांमध्ये समाधान 

चाळीसगाव  शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण  आज ग्रामीण भागात दौरा करीत असताना वरखेडे लोंढे बरेजवर भेट दिली. आणि ५२६ कोटींचा हा प्रकल्प पूर्ण झाल्याचा आनंद अनुभवला. आधुनिक टेली बेल्ट मशीनच्या साहाय्याने दररोज हजारो बॅग सिमेंट वापरून तसेच तापी महामंडळाच्या इतिहासात अगदी कमी कालावधीत पूर्ण होणारा उत्तर महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्पाकरिता मदत करणारे तत्कालीन केंद्रीय जलशक्ती मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरिशभाऊ महाजन यांचे जाहीर आभार मानतो. आज चाळीसगाव तालुक्यासह गिरणा खोऱ्यात जलक्रांती पूर्ण होत असल्याचा आनंद असल्याची भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आज चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर असताना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी वरखेडे लोंढे बँरेज
प्रकल्प स्थळावर भेट दिली यावेळी जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते.
खासदार उन्मेश दादा पाटील पुढे म्हणाले की आज हा वरखेडे लोंढे बँरेज प्रकल्प पूर्ण होत असताना मनाला आनंद झाला आहे. १९८९ व ९० साली या वरखेडे लोंढे बँरेज प्रकल्पाला मान्यता मिळाली. मी आमदार झालो तेंव्हा अतिशय तोडका निधी यासाठी खर्च झाला होता. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी झपाटून कामाला लागलो.प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता आपण घेतली, राज्य तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता घेतली, हा डी. पी.आर.रीवाईज करून याला केंद्रीय जल आयोगाची मान्यता घेतली. यासोबत वरखेडे लोंढे बँरेज प्रकल्पाचा बळीराजा जलसंजिवनी योजनेत समावेश करून नाबार्ड आणि राज्य सरकारच्या वतीने जवळपास ५२६ कोटींचा निधी यासाठी मिळविला. माननीय केंद्रीय जलशक्ती मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे या प्रकल्पाचा समावेश बळीराजा जलसंजिवनी योजनेत झाला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मुळे राज्य सरकारच्या वतीने निधी मिळवून दिल्याने अतिशय कमी कालावधीत हे काम पूर्ण झाले. तसेच खान्देश सुपूत्र गिरिशभाऊ महाजन यांच्या प्रयत्नामुळे या सर्व बाबींना गती प्राप्त झाली आणि आज हा प्रकल्प सर्वाधिक कमी कालावधीत पूर्ण होणारा तापी महामंडळातील एकमेव लक्षवेधी प्रकल्प ठरला आहे.

लवकरच अडवणार पाणी

वरखेडे लोंढे बँरेज या प्रकल्पात लवकरच पाणी अडविले जाणार असून राज्य सरकारकडून एका परवानगीची गरज आहे. त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. तामसवाडी गावाचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागणार आहे. या प्रकल्पात लवकरच पाणी अडविले जाणार असल्याने गिरणा खोरे परिसरातील माझा शेतकरी बांधव अधिक समृद्ध होणार असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर खासदारांवर अभिनंदनाचा वर्षाव

आज साईट वर जावून खासदार उन्मेश दादा पाटील यांनी फेसबुकवर जनतेसोबत संवाद साधून आनंद द्विगुणित केला. यावेळी हजारो शेतकरी नागरिकांनी हा संवाद अनुभवला. यावेळी फेसबुकवर वरखेडे लोंढे बँरेज प्रकल्प प्रत्यक्ष दिसत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी खासदार उन्मेश दादा यांचे अभिनंदन केले आहे. गिरणा खोरे लगतच्या गावांमध्ये खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या या प्रकल्पासाठी घेतलेल्या मेहनतीचे आणि धडाडीचे कौतुक होत आहे

About Shivshakti Times

Check Also

माजी मंत्री आ . गिरीष महाजन यांच्या हस्ते जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे प्रथम कोवीड सेंटरचे उदघाटन .

सुप्रीम कंपनीच्या सीएसआर मधून ऑक्सिजन पाईपलाईन जामनेर— शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण   राज्यात …

आत्मनिर्भर निधीतून आपल्या व्यवसायाला उभारी द्या — खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आवाहन

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या पुढाकारातून पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या जनजागृतीसाठी जिल्हा अभियानाचा शुभारंभ …

चाळीसगाव वृक्षांचा ‘वाढदिवस’ साजरा करत समाजापुढे “झाडे लावा,झाडे जगवा” चा संदेश ; युनिटी क्लब व शिवाजी नगर मित्र मंडळाचा उपक्रम

शिवशक्ती टाइम्स न्यूज चाळीसगाव (शिवशक्ती टाइम्स न्यूज – अमोल इंगळे )- ‘निर्धार हरितक्रांतीचा, वसा वृक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published.