Breaking News

राष्ट्रवादी कडून नागरिकांची रॅपीड अॅण्टिजन टेस्ट

नाशिक (दि.२८) नाशिक बयूरो चीफ – राजेश सोनावणे – कोरोनाला हरविण्यासाठी मिशन झिरो नाशिक अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पालकमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी व रॅपीड अॅण्टिजन टेस्ट मोहीम सुरु केली आहे.

          नाशिकमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोना बाधितांची संख्याही वाढत आहे. रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरली असून शहरातील विविध भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून रॅपीड अॅण्टिजन टेस्ट मोहीम सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात (दि.२७) सातपूर भागातील कामगार नगर, सातपूर गांव, जेलरोड परिसर, वडाळा गांव येथील नागरिकांची तापमान चाचणी व पल्स ऑक्सिजन चाचणी करून रॅपीड अॅण्टिजन टेस्ट घेण्यात आली. नाशिक शहरातील सहा विभागात नागरिकांची आरोग्य तपासणी व रॅपीड अॅण्टिजन टेस्ट सुरु असल्याचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.

          यावेळी अपूर्व हिरे, बाळासाहेब जाधव, सातपूर विभाग अध्यक्ष जीवन रायते, जय कोतवाल, पूर्व विधानसभा युवक अध्यक्ष राहुल तुपे, बाळा निगळ, निलेश भंदुरे, असिफ शेख, विकास सोनवणे, प्रशांत कोल्हे, साहेबराव मोगल, भिवानंद काळे, पप्पू पाटील, योगेश आहेर, मनोज म्हैसधुणे, योगेश चौरे, भिलाजी मढे, चंद्रकांत ठाकरे, मीनाक्षी गायकवाड, शिवाजी मटाले, छगन भंदुरे, मुस्ताक शेख, संदेश दोंदे, प्रसाद सांळुखे, राहुल तांबे, सुशिल शिंदे, फिरोज शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

भुकेल्याची भुक भागविण्याचे महत्वपूर्ण काम करते शिवभोजन केंद्र : कृषीमंत्री भुसे

सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी अल्प दरासह संकट …

माळमाथ्यावरील रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांनी केले खडयात वृक्षरोपण

मालेगाव : प्रतिनिधी  माळमाथ्यावरील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव या गावातील रस्त्यांची जीवघेणी दुरावस्था …

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश केंद्र सरकारने दिला खत सबसिडी वाढविण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published.