शिवशक्ती टाइम्स न्यूज – आनंद दाभाडे मालेगाव तालुक्यातील जळगाव (गाळणे) या गावातील माजी सरपंच श्री. खुशाल साहेबराव पवार वय (49 वर्ष) हे काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह झाले होते ..त्यांना “फरान हॉस्पिटल, मालेगाव” येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते .. त्यांच्या या कठिण काळात त्यांना श्री.बंडू काका बच्छाव यांनी सर्वतोपरी मदत केली … वेळोवेळी काकानी स्वतः दवाखान्यात जाऊन त्यानं काढा दिला, कॅम्फर नावाचे होमिओपॅथी औषध दिले ..स्वतः डॉक्टरांना भेटून पेशन्टची चौकशी केली .. कधी कधी रात्रीचा जर पेशंटला त्रास जाणवू लागला तर त्यावेळेस काकांनी स्वतः दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना भेटून ऑक्सिजनची व्यवस्था केली .. अशा प्रकारे काकांनी श्री.पवार यांना त्यांच्या कठीण काळात सर्वतोपरी मदत केली .. 15 ते 20 दिवस त्यांनी या कठीण आजार सोबत लढा दिला .. कधी कधी परिस्थिती खुप गंभीर झाली परंतु कुटुंबियांच्या सहकार्याने , डॉक्टरांच्या प्रभावी उपचारामुळे व श्री.बंडू काका बच्छाव यांच्या अनमोल सहकार्यामुळे आज श्री.पवार या अवघड परिस्थितीतुन सम्पूर्ण पणे बरे होऊन घरी परतलेले आहे .. फक्त एवढ्यावरच न थांबता श्री.बंडू काका बच्छाव यांनी आज श्री.पवार यांच्या घरी जाऊन त्यांचा बुके देऊन सत्कार केला आणि भावी निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या .. ग्रामीण भागात कोरोना विषयी खूप गैरसमज आहे .. लोक त्या पेशंटच्या जवळ येण्यास घाबरतात , त्याचा तिरस्कार करतात .. ही भीती दूर व्हावी , लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून बंडू काका स्वतः त्यांच्या वस्तीवर केले व त्यांचा बुके देऊन सत्कार केला .. काकांनी केलेल्या या उपकाराची जाण ठेवत श्री.पवार , त्यांचे कुटुंबीय व मित्र परिवार यांनी श्री. बंडू काका बच्छाव यांचे शाल व श्रीफळ देऊन आभार मानले
आज या कोरोनाच्या कठीण काळात जिथे जवळचे , आपले म्हणणारे व्यक्ती साथ सोडून देतात तिथे श्री. बंडू काका बच्छाव हे त्यांच्या जिवाभावाच्या व्यक्तींच्या मदतीसाठी कायम हजर होत आहे..
याप्रसंगी बंडू काकांनी कोरोनाच्या बाबतीत चुकीचे गैरसमज न बाळगता आपल्या मूलभूत कर्तव्यांची पूर्ती करा असे आवाहन केले 🙏🙏🙏🌹🌹🌹
