Breaking News

स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या काळाबाजाराची ‘सीआयडी’ मार्फत चौकशी – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ – शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण

स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या काळाबाजाराची ‘सीआयडी’ मार्फत चौकशी – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण  – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना करत राज्यातील नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर विशेष पथकांच्या माध्यमातून लक्ष ठेऊन कारवाई देखील करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मौजे सोनेगाव, ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर येथील स्वस्त धान्य दुकानातील तांदळाच्या अवैध व्यवहाराबाबत तसेच शेगाव तालुक्यातील बुलढाणा-अकोला सीमेवर 410 कट्टे भरलेला तांदूळाचा ट्रक पकडून जप्त करण्यात आला. या सर्व प्रकरणाची सी.आय.डी. मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यातील एकही नागरिक अन्नधान्यांपासून वंचित राहणार नाही यासाठी राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. तसेच या काळामध्ये अन्न,धान्याचा काळाबाजर करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या पथकातील पोलीसांनी जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथून गुजरातला जाणारा स्वस्त धान्य दुकानातील 24 टन तांदूळ भरलेला ट्रक पकडला होता. या तांदळाच्या अवैध विक्री व्यवहाराची तसेच शेगाव तालुक्यातील बुलढाणा-अकोला सीमेवर 410 कट्टे भरलेला तांदूळाचा ट्रक पकडून जप्त करण्यात आला. या तांदळाच्या काळाबाजार व अवैध विक्री व्यवहाराची चौकशी सी.आय.डी. मार्फत करण्यात येणार असून दोषींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल. त्यामुळे राज्यातील गैरव्यवहारांना आळा बसणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

About Shivshakti Times

Check Also

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक……..

दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण …

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची विधानभवनात गृहमंत्र्यांसोबत बैठक संपन्न

पोलिस पाटीलांचे मानधन वाढीसह अनेक प्रश्न मार्गी लागणार शिवशक्ती टाइम्स न्यूज महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील …

बाजारपेठांना ‘लग्नसराई’चा साज…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण ) बदलापूर : तुळशी विवाहनंतर आता लग्नसराईला सुरुवात झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *