Breaking News

माजी मंत्री आ . गिरीष महाजन यांच्या हस्ते जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे प्रथम कोवीड सेंटरचे उदघाटन .

सुप्रीम कंपनीच्या सीएसआर मधून ऑक्सिजन पाईपलाईन

जामनेरशिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण   राज्यात कोरोना संसर्गाच्या महामारीने जळगांव जिल्ह्यासह तालुक्यात तसेच शहरात कोरोना प्रादुर्भाव काही केल्या कमी होत नाहीं . तशात रुग्णांना जळगांव येथे उपचारासाठी हलवावे लागत असल्याने होणारी बाधीत रुग्णांची होत असलेली हाल अपेष्टा लक्षात घेता जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे 2 वार्डा मध्ये कोवीड सेंटरची व्यवस्था करुन तसेच सुसज्ज अशा वैद्यकीय सेवा व गोडगांव येथील सुप्रीम इं . यांच्या सहकार्याने C.S.R. मधुन कोवीड सेंटर मध्ये उपचारा साठी दाखल असलेल्या बाधीत रुग्णांच्या सेवेसाठी ऑक्सीजन पाईप लाईन चे व कोवीड सेंटर चे उदघाटन आज माजी मंत्री आ . गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले . आता कोणत्याही बाधीत रुग्णांना जळगाव न जाता चांगल्या प्रतीचे उपचार व वैद्यकीय जामनेर येथे घेता येईल . कुणीही या सेवेपासून वंचीत राहणार नाही असे प्रतीपादन . आ . महाजन यांनी उपस्थितांना दिले त्या वेळी
प्रांताधिकारी दीपमाला चौरे ,तहसिलदार अरुण शेवाळे, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ .विनय सोनवणे, मुख्याधिकारी राहुल पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . राजेश सोनवणे, डॉ . वैशाली पाटील, डॉ . रविंद्र पाटील, डॉ . प्रशांत महाजन, डॉ . हर्षल चांदा, आरोग्य दुत अरविंद देशमुख आदी आरोग्य सेवक उपस्थित होते .

About Shivshakti Times

Check Also

आत्मनिर्भर निधीतून आपल्या व्यवसायाला उभारी द्या — खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आवाहन

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या पुढाकारातून पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या जनजागृतीसाठी जिल्हा अभियानाचा शुभारंभ …

चाळीसगाव वृक्षांचा ‘वाढदिवस’ साजरा करत समाजापुढे “झाडे लावा,झाडे जगवा” चा संदेश ; युनिटी क्लब व शिवाजी नगर मित्र मंडळाचा उपक्रम

शिवशक्ती टाइम्स न्यूज चाळीसगाव (शिवशक्ती टाइम्स न्यूज – अमोल इंगळे )- ‘निर्धार हरितक्रांतीचा, वसा वृक्ष …

चाळीसगाव शहरातील तितुर नदीवरील पुलाचे काँक्रीट पहिल्याच पुरात गेले वाहून……

#चाळीसगाव :- (प्रतिनिधी-शिवशक्ती टाइम्स न्यूज) : चाळीसगाव शहरातील सुवर्णाताई नगर ते शास्त्री नगरला जोडणारा तितुर …

Leave a Reply

Your email address will not be published.