गायत्री पाटील ९६ टक्के गुण मिळवून प्रथम!!
जामनेर / (शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण) – मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या १० वी बोर्डाच्या परीक्षेत जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी हायस्कूलने गुणवत्तेची उज्वल परंपरा कायम ठेवत एकुण ९७.७९ टक्के गुणांनी आघाडी घेतली.यावर्षी पण मुलींनीच बाजी मारली असुन पहिला क्रमांकाने उर्तीण होवुन प्रथम येण्याचा बहुमान कु .गायत्री जयंतराव पाटील या विद्यार्थिनींस मिळाला .तिला ९६ .०० टक्के गुण मिळाले.कु .आचल मनोज महाजन ही विद्यार्थीनी दुसऱ्या क्रमांकाने उर्तीण झाली.तिला ९५.४० टक्के गुण मिळाले .तर तिसऱ्या क्रमांकाने सेजल राजेश पाटील ही विद्यार्थिनीं ९४.२० टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली . त्याच प्रमाणे आदेश विजय
रोडीये या विदयार्थ्यांने
९३ .८३ टक्के मिळवुन चतुर्थ क्रमांक पटकविला . तर प्रशांत राजेंद्र पाटील याला
९३ .४० टक्के मिळाले तो पंचम श्रेणीने उर्तीण झाला . या सर्वांनी यशाचे शिखर गाठुन इंदिराबाई ललवाणी हायस्कुलचा नाव लौकीक वाढविला . या वर्षी एकुण ३६२ विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले त्यापैकी ३५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सर्वच गुणवंतांचे संस्थेचे आधारस्तंभ माजी खासदार श्री ईश्वरलाल जैन ,माजी आमदार दत्तात्रय महाजन ,संस्थाध्यक्ष राजेंद्र महाजन ,सचिव किशोरभाऊ महाजन ,उपाध्यक्ष विनित महाजन ,ज्येष्ठ संचालक श्रीराम महाजन ,संचालक आणि माजी मुख्याध्यापक के.व्ही.महाजन ,संचालक माजी आमदार मनीषदादा जैन ,फकिरा धनगर,संजय महाजन ,भगवान बेनाडे,मुख्याध्यापक पी.आर.वाघ, ललवाणी ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य जे.पी.पाटील ,उपमुख्याध्यापिका सौ.सुनंदा देवकर,पर्यवेक्षक एस.जी.अग्रवाल,एस.बी.भोई,कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र बाविस्कर यांनी अभिनंदन केले .