Breaking News

१ आगस्ट २०२०रोजी दुध दरवाढ आंदोलन

कोपरगांव- (शिवशक्ती टाइम्स) युसुफ पठाण – भारतीय जनता पार्टी कोपरगांव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव मा अा सौ स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रत्येक दुध संकलन केंद्रावर दुध उत्पादक शेतकरी व भारतीय जनता पार्टी चे बुथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख गणप्रमुख,गटप्रमुख,पदाधिकारी, कार्यकर्ते दुधदरवाढीबाबात आंदोलन करणार आहे.

गेली चार महिन्यापासून कोविड१९ या आजारामुळे अत्यंत अडचणीत आलेला शेतकरी फक्त दुग्ध व्यवसायावर उपजिविका साधत आहे.पंरतु आघाडीचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी दुधाला राज्यांमध्ये 30 ते 32 रुपयां पर्यंत भाव मिळत होता आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर या सरकारने जाणून-बुजून शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव कमी केले आणी दुधसंघाचे भाव मात्र ‘जैशे थे’ आहे,याचा निषेध म्हणून दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .त्यातील काही प्रमुख मागण्या
1) दुधाला तीस रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे.

2)दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिलिटर दहा रुपये अनुदान जमा झालेच पाहिजे.

3)अतिरिक्त दुधापासून निर्माण होणाऱ्या दूध पावडरला 50 रुपये अनुदान मिळाले पाहिजे.

4)8.5.SNf व 3.5 Fat असलेल्या दुधाला पूर्वी 30 पैसे डिडक्शन होते ते आज एक रुपया केल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे ते ताबडतोब 30 पैसे करा

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दूध दरवाढीचे केवळ आश्वासन दिले आहे. त्यानंतर शासनाने ठोस असे काहीच शेतकऱ्यांच्या पदरात टाकले नाही. दूधाला योग्य दर मिळावा यासाठी 1 ऑगस्ट2020 रोजी दुध उत्पादक शेतकरी व भारतीय जनता पार्टी च्या वतीने दूध दरवाढ आंदोलन केले जाणार आहे तरी आपण जास्तीत जास्त शेतकरी व
दूध उत्पादकानी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

आपले नम्र
श्री साहेबराव किसनराव रोहोम तालुकाध्यक्ष
श्री कैलास वसंतराव खैरे
शहराध्यक्ष
श्री बाळासाहेब दत्तात्रय पानगव्हाणे
तालुकाध्यक्ष युवा मोर्चा
श्री वैभव सुधाकर आढाव
शहराध्यक्ष युवा मोर्चा
भारतीय जनता पार्टी कोपरगांव विधानसभा मतदारसंघ

About Shivshakti Times

Leave a Reply

Your email address will not be published.