मालेगाव – शिवशक्ती टाइम्स न्यूज – कोरोनाच्या प्रादुर्भावात राज्यात आज दि.२९ राज्याचा माध्यमिक बोर्डाचा निकाल दुपारी एक वाजेला ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला,मागील वर्षापेक्षा ह्या वर्षी गुणात्मक संपादणूक अधिक आहे.
मालेगावातील रेल्वे इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या शैक्षणिक निकालाची परंपरा कायम राखले आहे. 2020 च्या एसएससी बोर्डाच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांकावर कुमारी केतकी फकीरचंद पाटील हिला 95.80% गुण मिळविले तर व्दितीय क्रमांक चि. आदित्य किशोर दाभाडे याने 95.60% गुण मिळून यश संपादन केले. तिसऱ्या क्रमांकावर स्वराज वीरेंद्र सरोदे व चौथा क्रमांक कल्पेश रमेश महाले तसेच वैशाली उमेश अग्रवाल हिने पाचवा क्रमांक मिळवून यश संपादन केले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय आपल्या शिक्षकांना व आपल्या पालकांना दिले आहे.
आदित्य किशोर दाभाडे हे हे मालेगावातील प्रसिद्ध digispace photo lab चे संचालक व मालेगाव फोटोग्राफर असोसिएशन चे माजी उपाध्यक्ष श्री किशोर दाभाडे यांचे चिरंजीव आहेत
या यशामुळे या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे शिवशक्ती टाइम्स न्यूज परिवाराकडून या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा