Breaking News

चीन – पाकिस्तान ६०० किमी पर्यत उद्‍ध्वस्त करुन ठेवणार – राफेल  (शिवशक्ती टाइम्स न्यूज -)

चीन – पाकिस्तान ६०० किमी पर्यत उद्‍ध्वस्त करुन ठेवणार – राफेल 🛑
✍️देश विदेश 🙁 शिवशक्ती टाइम्स न्यूज – आनंद दाभाडे )

देशात विदेश :⭕ बहुप्रतिक्षित राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी आज अंबाला येथे लँड करणार आहे. एअरफोर्स स्टेशनवर यासाठी पुर्ण तयारी करण्यात आली आहे. 3700 किमी मारक क्षमता असलेले 5 राफेल विमान आल्याने हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. अण्वस्त्रांसह अनेक शस्त्रे याद्वारे लाँच करणे शक्य आहे. शस्त्रांच्या स्टोरेजसाठी 6 महिन्यांची गॅरेंटी देखील असेल. याशिवाय राफेलमध्ये रडार सिस्टमवर एक टन कॅमेऱ्याची सुविधा आहे. ही सुविधा या विमानाला इतर विमानांपेक्षा वेगळे बनवते.

रडार सिस्टमवर एक टन कॅमेऱ्याची सुविधा असल्याने याचा निशाणा अचूक असेल. कॅमेरा एवढा संवेदनशील आहे की जमिनीवर कोणत्याही छोट्या केंद्राला याने पाहणे शक्य आहे.

राफेल विमान जवळपास 60 हजार फूट उंचीवरून उड्डाण घेऊ शकते. यामुळे भारतीय हवाई दलाच्या आधुनिकिकरणाला गती मिळेल.

राफेल लढाऊ विमानामुळे हवाई दल अधिक मजबूत तर होईलच शिवाय एअर विजिलेंस देखील अधिक सक्षम होईल. राफेलची रेंज 3700 किमी सांगितली जात आहे. मात्र हवेतच रिफ्यूल करता येत असल्याने, याची रेंज वाढवता येऊ शकते. चीन आणि पाकिस्तानच्या कारवायांना उत्तर देण्यासाठी राफेल भारतीय हवाई दलातील सर्वात खतरनाक शस्त्र आहे. राफेल एअर स्पेस सीमा न ओलांडता पाकिस्तान-चीनच्या 600 किमी आत टार्गेटला पुर्णपणे उद्धवस्त करू शकते.

राफेलची आणखी एक खास गोष्ट म्हणजे विमान उड्डाण घेतल्यानंतर 100 किमीच्या कक्षेत 40 टार्गेटवर एकसोबत निशाणा साधू शकते. हे मल्टी डायरेक्शनल रडारमुळे शक्य आहे. टू सिटर राफेल विमानामध्ये पहिला पायलट शत्रूचे टार्गेट लोकेट करेल व दुसरा पायलट लोकेट करण्यात आलेल्या टार्गेटला सिग्नल मिळाल्यानंतर त्याला नष्ट करण्यासाठी विमानातील शस्त्रांना ऑपरेट करेल. राफेल शत्रूच्या विमानाचे रडार देखील जाम करू शकते. राफेल विमानाच्या कॉकपिटमध्ये असे सिस्टम डिझाईन करण्यात आले आहे.

ज्यामुळे युद्धाच्यावेळी पायलटला पुर्ण लक्ष उड्डाणासोबत शत्रूच्या टार्गेटला लक्ष करण्यात देता येईल…

About Shivshakti Times

Check Also

मालोजी राजे गढीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणार -सांस्कृत‍िक कार्य मंत्री अमित देशमुख

मालोजी राजे भोसले गढी दुरूस्ती व संवर्धनाबाबत आढावा बैठक शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ …

नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमधून दीड वर्षांचे बाळ पळविले; भामटा सीसीटीव्हीत कैद

*नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमधून दीड वर्षांचे बाळ पळविले; भामटा सीसीटीव्हीत कैद !*  शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी …

स्वत:चा सख्खा भाऊ १२ वर्षे राज्याचा गृहमंत्री असतानाही…;

आर. आर. पाटलांच्या भावाचं अजित पवारांकडून कौतुक…. सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *