*मालेगाव महानगरपालिका,मालेगाव*
मालेगाव – शिवशक्ती टाइम्स न्यूज – *महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभराचा उद्याच्या नियोजित पाणी पुरवठा वेळा पत्रकाला फटका*
आज दि.30 जुलै 2020 रोजी 5 वाजे पासून गिरणा पंपिंग स्टेशन येथे खंडित झालेला वीजपुरवठा अजूनही सुरळीत झालेला नाही.
आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास महावितरण कंपनीची गिरणा पंपिंग स्टेशन येथील 33 केव्ही केबल चे किट जळाल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.
अशा परिस्थितीत तत्काळ सप्लाय सुरू करायला दुसरी अतिरिक्त केबल जागेवर तयार ठेवलेली असते. अशा वेळी जळालेली केबल पोलवरून काढून त्याठिकाणी दुसरी केबल चढवण्यासाठी फार कमी वेळ लागतो.
मात्र जागेवर उपलब्ध असलेली Standby केबल ही अपुरा स्टाफ व ट्रॅक्टर न मिळाल्याने चार तास उलटून देखील महावितरण कंपनीस बदलता आलेली नाही.
अखेर रात्री 9.30 वाजता महावितरण तर्फे उपलब्ध केबल न वापरता जळालेली केबल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून रात्री 12 वाजे दरम्यान वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.
यामुळे दि.31 जुलै व पुढील कालावधीत नियोजित पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे.
तरी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीच्या बेजबाबदार कृती मूळे नियोजित पाणीपुरवठा विस्कळीत होणार असून नागरिकांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे.
विद्युत अधिक्षक
मालेगाव महानगरपालिका,मालेगाव