Breaking News

वनविभागाने पकडला अवैध वृक्ष तोडीचा ट्रक – शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी अमोल इंगळे )

वनविभागाने पकडला अवैध वृक्ष तोडीचा ट्रक

चाळीसगाव शिवशक्ती टाइम्स न्यूज – तालुक्यातील तांबोळे येथील शेतातून विनापरवाना वृक्षतोड करून मालेगाव कडे लाकडे वाहून नेणारा मिनी ट्रक वनविभागाच्या कर्मचारी यांनी दि 30 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास तालुक्यातील खडकी बायपास जवळ पकडला असून चाळीसगाव प्रादेशिक वनविभागात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि 30 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास वनविभाग प्रादेशिक चे नाकेदार संजय जाधव हे गस्तीवर असताना त्यांना खडकी बायपास वर मिनी ट्रक क्र MH 18 M 5378 हा मालेगाव कडे संशयित रित्या जात असल्याने त्यांनी लागलीच ट्रॅक थांबवून चौकशी केली असता त्यात बाभूळ व लिंबाची लाकडे भरलेली होती अधिक चौकशी केल्यावर सदर लाकडे ही तांबोळे येथील शेतकरी यांच्या शेतातील असून ती विना परवाना तोडून वाहतूक करून 4 घनमीटर लाकुड मालेगाव येथे नेत असल्याची माहिती ट्रक चालक मोहम्मद इब्राहिम मोहम्मद मुनीर रा मालेगाव याने दिल्यावर ट्रक वनविभागाच्या कार्यालयात लावून चालकवर वन गुन्हा 05/2020 भारतीय वनअधिनियम 1947 चे कलम 41, 2 ब प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास नाकेदार संजय जाधव करीत आहेत तर व्यापाऱ्या चा शोध वनविभागाकडून सुरू आहे.

About Shivshakti Times

Check Also

राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महिला दिना निमित्त सेवा दलातील महिला रणरागिनींना अभिवादन

शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव- येथील राष्ट्र सेवा दलाच्या वतीने महिला दिना निमित्त सेवा दलातील महिला …

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलन

शिवशक्ती टाइम्स न्यूज : मालेगाव- दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा …

कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांनी अजंग-रावळगांव MIDC संदर्भात घेतलेल्या बैठकीचे हायलाइट्स

कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांनी अजंग-रावळगांव MIDC संदर्भात मालेगांव शहरातील हॉटेल मराठा दरबार येथे घेतलेल्या बैठकीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *