Breaking News

महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या पुतळा जागेची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली पाहणी

साडे बारा कोटी खर्चाच्या ग्रामीण रुग्णालय व अडीच कोटींच्या खर्चातून साकारणारे ट्रामा केयर सेंटर च्या प्रांगणात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे लवकरच होणार अनावरण

खासदार उमेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून साकारला जाणार पुतळा

चाळीसगाव – (शिवशक्ती टाइम्स) युसुफ पठाण  शासकीय दूध डेअरीच्या भव्यदिव्य परिसरात ट्रामा केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयाची इमारत साकारली गेली असून या साडेपाच एकर परिसराला खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या दूरदृष्टी व नियोजनातून महात्मा फुले जन आरोग्य संकुल हे नाव देण्यात आले आहे. तत्कालीन पालकमंत्री गिरिशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या या आरोग्य संकुलाच्या भूमिपूजन प्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी या रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविला जाईल.अशी घोषणा केली होती. येत्या काही दिवसात हे आरोग्य संकुल इमारत पूर्ण होत असून येत्या काळात येथे सर्व आरोग्य सुविधा मिळणार असल्याने या प्रवेशद्वाराजवळ लवकरच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवला जाणार आहे.खासदार उन्मेश दादा पाटील यांनी या जागेची पाहणी करून पुतळा बसवण्यात संदर्भामध्ये वेगवान हालचाली केल्याने लवकरच हा पुतळा साकारला जाणार आहे.

महत्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प

जळगाव जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाकांक्षी आरोग्य संकुल म्हणून उदयास येणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य संकुलाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून आतील इलेक्ट्रिक, फर्निचर कामे प्रगतीपथावर असून लवकरच संपुष्टात येत आहे या परिसरात सध्याच्या कोरोना महामारीच्या
धर्तीवर पन्नास बेडचे अत्याधुनिक सेंटर उभारले जाणार असून 200 बेड चे क्वारंटाइन सेंटर साकारले जाणार आहे या इमारती मुळे तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या चाळीसगाव तालुका व तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गावर नित्यनेमाने होणाऱ्या अपघातांच्या प्रसंगी जखमींना धुळे मालेगाव जळगाव औरंगाबाद येथे हलवावे लागते अशा बिकट प्रसंगी अत्याधुनिक ट्रामा केअर सेंटर व रुग्णालय असावे या दूरदृष्टी व नियोजनातून खासदार उन्मेश दादा पाटील यांनी या इमारतीसाठी मोठा निधी मिळवीला होता. उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जा असलेल्या इमारतीमध्ये नागरीकांच्या सर्व आरोग्य गरजा पूर्ण होणार असल्याने शहरवासीयांच्या व ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागून आहे या आरोग्य संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्या करीता चौथारा बांधण्याचे काम पूर्ण झाले असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या परिसराला भेट दिली. याप्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी ही बाब जिल्हाधिकारी महोदय यांच्या कानावर घातली होती. प्रांताधिकारी लक्ष्मीकांत सातालकर यांनी जिल्हाधिकारी पुतळा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने या पुतळ्यासाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही अशी पुष्टी जोडली होती. खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या संकल्पनेतील हा पुतळा संकल्पना लवकरच साकारले जाणार असल्याचे सूतोवाच यावेळी उपस्थित अधिकारी पदाधिकाऱ्यांनी केले होते ..

पदाधिकाऱ्यांसोबत जागेची केली पाहणी

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी कार्यकर्ते पदाधिकारी समवेत आज या चौथाऱ्याची पाहणी केली लवकरच येथे पुतळा साकारला जाणार असल्याची माहिती देखील पदाधिकाऱ्यांनी दिली याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख व दहिवद उपसरपंच भीमराव नाना खलाने ,माजी पंचायत समिती सदस्य जगन आप्पा महाजन,पी ओ महाजन सर, आप्पा महाजन, सचिन महाजन, पंकज पवार, लखन मोरे , माजी सरपंच रवीआबा पाटील,सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र काका जैन, गणेश चित्ते (वाडे)यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

पुतळा उभारण्यामागची भावना

महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा साकारण्यामागचा उद्देश विशद करताना खासदार उन्मेश दादा पाटील म्हणाले की देशात प्लेगच्या महामारीच्या संकटाच्या प्रसंगी या पती-पत्नीनी आपला जीव धोक्यात घालून प्लेग रुग्णांची सेवा केली होती स्वतःचा जीव धोक्यात घालून देखील आपली अविरत आरोग्यसेवा यांनी सुरू ठेवली होती.क्रांती ज्योती सावित्रीबाई यांचा तर १८ मार्च १८९७ साली पुण्यात प्लेग रुग्ण सेवेत मृत्यू झाला होता. या गोष्टीचे भान ठेवत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा येथे साकारला जावा ही इच्छा होती आणि ती प्रत्यक्षात साकारली जाणार असल्याने मला मनस्वी आनंद असल्याची भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

उत्तर महाराष्ट्रातील एकमेव आरोग्य संकुल..

सोळा हजार स्क्वेअर फुटांमध्ये दहा खाटांचे ट्रामा केअर सेंटर आणि ३६ हजार स्क्वेअर फुट जागेवर ३० खाटांचे ग्रामीण रूग्णालय मंजूर झाले होते.तसेच आजमितीस बांधकाम पूर्ण झाले आहे. ग्रामीण रुग्णालयात जनरल वाॅर्ड, पुरूष महिला वाॅर्ड, सर्जिकल ओपीडी, एक्सरे रूम, पॅथोलॉजी लॅब, ऑपरेशन थिएटर, मेडिकल स्टोर, क्रिटिकल केअर आदी सर्व सुविधा असणार आहेत. रुग्णालयाचे संपूर्ण बांधकाम हे आरसीसीमध्ये करण्यात आले असून संपूर्ण रुग्णालयामधील फर्निचर काम प्रगतीपथावर आहे. या परिसरात बगीचा साकारला जाणार असून संपूर्ण संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले असून या कामाची पाहणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली.
साडे बारा कोटी खर्चाच्या ग्रामीण रुग्णालय व अडीच कोटींच्या खर्चातून साकारणारे व साडेपाच एकरात असलेल्या कोट्यवधी रुपये खर्चाच्या या ट्रामा केअर व ग्रामीण रुग्णालयाचे इमारत धुळे मालेगाव रस्त्यावरून जाताना लक्ष वेधून घेत आहे.शासकीय दुध योजनेच्या जागेत ही इमारत साकारले गेली असून अतिशय उत्तम दर्जाचे बांधकाम फर्निचर व रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले एखाद्या खाजगी तारांकित हॉस्पिटलला लाजवेल अशा पद्धतीची वास्तू रचना,आणि हवेशीर बांधकाम झाल्याने ही वास्तु तालुका वासियांना दीर्घकाळ उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा देईल असा आशावाद केंद्रीय पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टण्डिंग कमेटी सदस्य खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केला आहे.

About Shivshakti Times

Check Also

चाळीसगाव तालुक्यासह गिरणा खोऱ्यात जलक्रांती पूर्ण होत असल्याचा आनंद — खासदार उन्मेश दादा पाटील (शिवशक्ती टाइम्स न्यूज)

५२६ कोटींचा वरखेडे लोंढे बँरेज महाकाय प्रकल्पाकरिता मदत करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री …

आत्मनिर्भर निधीतून आपल्या व्यवसायाला उभारी द्या — खासदार उन्मेश दादा पाटील यांचे आवाहन

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या पुढाकारातून पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या जनजागृतीसाठी जिल्हा अभियानाचा शुभारंभ …

चाळीसगाव वृक्षांचा ‘वाढदिवस’ साजरा करत समाजापुढे “झाडे लावा,झाडे जगवा” चा संदेश ; युनिटी क्लब व शिवाजी नगर मित्र मंडळाचा उपक्रम

शिवशक्ती टाइम्स न्यूज चाळीसगाव (शिवशक्ती टाइम्स न्यूज – अमोल इंगळे )- ‘निर्धार हरितक्रांतीचा, वसा वृक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published.